टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील सर्व दुकाने आज सुरू ठेवणार असल्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे.
ग्रामीण भागात सर्व दुकाने जोपर्यंत बंद करणार नाहीत तोपर्यंत शहरातील सर्व दुकाने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरूवारी सायंकाळच्या सुमारास सुधारित आदेश काढला होता. जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात या वेळेत चालू राहणार आहे.
शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवेमधील दुकाने वगळता बाकीचे सर्व दुकाने या दिवशी बंद ठेवा असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.
शहरातील व्यापाऱ्यांवर अन्याय : अरुण किल्लेदार
मंगळवेढा शहर सोडले तर या आदेशाचे पालन ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी पाळलेले दिसुन आले नाही.त्यामुळे मंगळवेढा शहरातील व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे.
नियम फक्त शहरातील व्यापाऱ्यांनीच पाळायचे का ? आज मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांना कळविली आहे. त्यांचेशी चर्चा करुन शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळी आपापली दुकाने उघडावित.
तरच व्यापाऱ्यांना न्याय मिळेल व्यापारी संघटना आपल्या पाठिशी आहे याची सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी. सर्व व्यापाऱ्यांना एक नियम असेल तरच या प्रशासनाचे बंदला सहकार्य केले जाईल.
अन्यथा बीड प्रमाणे मंगळवेढा बेमुदत बंद करण्याचा निर्णय व्यापारी महासंघाची मिटिंग घेवून निर्णय घेतला जाईल. सर्व व्यापाऱ्यांनी आपली एकजुट दाखवुन सहकार्य करावे असे आवाहन व्यापारी मघासंघाचे सचिव अरुण किल्लेदार यांनी केले आहे.
अन्यथा कायदेशीर कारवाई करू…
याबाबत मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले की, सर्वप्रथम आम्ही सर्व दुकानदार यांना आदेशाचे पालन करण्याची विनंती करू जे दुकानदार आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
काय आहे आदेश:
सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडे व बाजार जनावरांचा बाजार बंद करण्यात आले आहेत. खाद्यगृह, परमिट रूम व बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत कोव्हिडच्या नियमांचे पालन करून 50 टक्केच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या आदेशातून अत्यावश्यक सेवा/मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व फळे, किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना या आदेशातून सुट देण्यात आली आहे.
होम डिलिव्हरीसाठी किचन व वितरण कक्ष रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिम, व्यायाम शाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार आहेत.
सर्व प्रकारची धार्मिक स्थळेही सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज