mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 18, 2021
in क्राईम, मंगळवेढा
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा पोलीस ठाण्यात २००८ मध्ये कार्यरत तत्कालिन पाेलीस उपनिरीक्षक अंबादास हरिबा यादव यांनी पाेलीस ठाण्यामध्ये पीडित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा येथील न्यायालयात दाखल फौजदारी खटल्यात दोषी धरुन ६ महिने सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.

यावर फौजदार यादव यांनी केेलेल्या अपिलावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा कायम केली.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. माेरे यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी झाली.

पीडित मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने पळवून नेले हाेते. याविषयी पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती.पीडित मुलगी अकलूज बसस्थानकावर पोलिसांना सापडली होती.तिला मंगळवेढा पोलीस स्थानकात आणण्यात आले.

दि.१७ मार्च २००८ रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव व एक महिला पोलीस मुलीला खोलीत घेऊन गेले. महिला पोलीस त्या ठिकाणाहून निघून गेल्यावर पीडित मुलीला लज्जा वाटेल अशी वर्तणूक पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव यांनी केली.

संबंधित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. या प्रकाराबाबत तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र ती घेण्यात आली नाही. त्यानंतर मुलीच्या आईने मंगळवेढा येथील ज्यु. मॅ. वर्ग १ कोर्टात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

त्याप्रमाणे नियमित फौजदारी खटल्याचे कामकाज चालले.यामध्ये पीडित मुलगी व तिच्या आई-वडिलांची साक्ष नोंदविण्यात आली होती. आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला भादंवि ३५४ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, पीडित मुलीला सीआरपीसी ३५७ (३)नुसार ५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलेला होता.

दोन्ही पक्षांचा युक्तीवाद, न्यायालयातील जाबजबाब व इतर कागदपत्रांचे अवलोकन करुन पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. माेरे यांनी अपील नामंजूर केले. यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.

या निकालाबद्दल यादव यांनी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. या केसमध्ये साक्षीदारांच्या साक्षीमध्ये कोणतीही विसंगती आढळली नाही. तपासी अधिकाऱ्यांची साक्ष ही तांत्रिक स्वरुपाची असल्याने त्याचा कोणताही परिणाम या केसवर हाेत नाही.

कोणतीही महिला पोलीस सोबत नसताना यादव यांनी महिला पोलीस बाहेर गेल्यावर हे कृत्य केले आहे. या सर्व बाबी तपासून ही शिक्षा सुनावण्यात आली. ती कायम करण्यात यावी असा युक्तीवाद करण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 25, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढ्यातील तरुणाचा दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक! सोलापूरच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, नेमके काय आहे कारण

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा