टीम मंगळवेढा टाईम्स ।
ज्वारीच्या मोडणीचे कामासाठी गेलेले असताना त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे अज्ञात चोरटयाने घरामध्ये प्रवेश करून १ लाख ३० हजार ५०० रुपयांचे सोने , चांदीचे दागिने व ५०० रुपयांच्या चलनी नोटा चोरटयांनी नेल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० ते १.३० च्या दरम्यान लोणार ता.मंगळवेढा येथे घडली आहे.
याबाबत सुनिता सत्यावान कुल्लाळ (वय ३० रा.लोणार ता.मंगळवेढा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी सुनिता कुल्लाळ या त्यांच्या शेतामध्ये ज्वारी मोडण्याचे काम करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता.
उघडया असणाऱ्या दरवाजाचा फायदा घेवून अज्ञात चोरटयाने घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ४५ हजार रुपये किमतीचे १ तोळा ८ ग्रॅम सोन्याच्या तीन सोन्याच्या चेन, बदाम व २७ हजार ५०० रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठया, २५ हजार रुपये किमतीचे ठुशी व झुबे, ५ हजार रुपये यामध्ये १० पाचशे रुपयांच्या चलनी नोटा असा १ लाख ३० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेला आहे.
अज्ञात चोरटयाविरूध्द भा.दं.वि .३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पो.हे. सुहास देशमुख करीत आहेत.
मंगळवेढयातील दोन विज वितरण अधिकाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या
मंगळवेढा येथील विज वितरण कार्यालयाकडील दोन कनिष्ठ अभियंत्यांची अन्यत्र बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने दोन कनिष्ठ अभियंते दाखल झाले आहेत.
दरम्यान, या दोन अधिकाऱ्यांनी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागाचा पदभार घेतला आहे. मंगळवेढा शहराचे कनिष्ट अभियंता विजय आमरे यांची बदली मोहोळ येथे झाल्याने त्यांच्या जागेवर चिपळूण येथून सचिन कोळेकर हे आले असून त्यांनी येथील पदाचा पदभार स्विकारला आहे.
मंगळवेढा ग्रामीण विभागाचे कनिष्ठ अभियंता शाम क्षीरसागर यांची बदली पंढरपूर येथे झाल्याने त्यांच्या जागेवर सांगोला येथून बलवान आलदर हे हजर झाले असून त्यांनीही आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे.
मंगळवेढा शहर हे संवेदनशील असल्यामुळे येथे विनाखंडीत विज पुरवठा रात्रीच्या वेळी देणे गरजेचे असल्याने येथे तत्पर अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे.
शहराला उन्हाळयात व पावसाळयात सुरळीत विज पुरवठा देणे तसेच येथील विज बिल वसुली हे कोळेकर यांना एक आव्हान आहे.
ग्रामीण भागात भिमा नदीकाठचा भाग येत असून या भागात कृषीपंपाचे ग्राहक मोठया संख्येने असून म्हणावी तशी वसुली होत नसल्याने या भागातील वसुली करणे आलदर यांना ही एक आव्हान आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज