मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून तालुक्यातील नंदुर व उचेठाण या गावातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 32 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 322 वर गेली आहे.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एकाही रुग्णांला उपचारानंतर घरी सोडणेत आलेले नाही.
आज दि.13 ऑक्टोबर रोजी 0 नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 52 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 52 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह -10 आणि निगेटिव्ह -42 जणांचे अहवाल आलेले आहेत . सदरचे नागरिक मंगळवेढा शहर -05 , मरवडे -01 , लवंगी -01 , दामाजीनगर -02 , मारापूर -01 येथील आहेत . 4. सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे एकही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेला नाही.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 322 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 186 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 104 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज