टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी निखील आवताडे (रा.मंगळवेढा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादीची उस्मानाबाद जिल्हयातील नात ही गेल्या पाच वर्षापासून आजोबाकडे रहावयास आहे.
दि.२२ रोजी सकाळी १०.०० वा . यातील फिर्यादी तथा आजोबा उंब्रज ता . इंडी येथे कामानिमित्त गेले होते.
शेतातील काम करून ते व त्यांचा मुलगा दुपारी १.३० वा . पुन्हा घरी आल्यानंतर घरास कडी लावलेली होती.
अल्पवयीन मुलगी तथा नात घरात दिसली नसल्याने तीचा आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
राहते घरातून अज्ञात कारणावरून निखील आवताडे याने कशाची तरी फुस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज