टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलिस भरतीसाठी अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या एका 22 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने तीच्याशी लैंगिक संबंध ठेवून ऐनवेळी लग्नास नकार दिल्याप्रकरणी चंद्रकांत सुरेश कोळी (रा.सिध्दापूर) याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील 22 वर्षीय तरुणी ही अन्य तालुक्यातील असून सन 2021 मध्ये तीने बालाजीनगर येथील पोलिस भरती अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होती.
या दरम्यान आरोपी चंद्रकांत कोळी यानेही तेथेच अॅडमिशन घेतल्याने या दोघांची ओळख निर्माण झाली होती. अकॅडमीत असताना आरोपी हा नेहमी फिर्यादीचा पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न करायचा.
जून 2021 मध्ये फिर्यादीने नवीन मोबाईल घेतल्यावर आरोपीने मोबाईल नंबर मागून घेतला व त्यावर सारखे मेसेज पाठविण्याचे कृत्य करायचा.दि.7 मे 2021 रोजी पिडीता रहात असलेल्या खोलीच्या पाठीमागे आरोपीने येवून
माझे तुइयावर प्रेम असून तु मला खूप आवडतेस असे म्हणताच पिडीतेने त्याला नकार दिला.त्यावेळी तुझा काय प्रॉब्लेम आहे ते मला एकदा सांग,मला तुइयासोबत लग्न करायचे असून मी तुइया घरच्यांशी बोलतो असे म्हणाला.
वेळप्रसंगी मी घरच्यांचा मारही खाईन पण तुइयाशीच लग्न करणार आहे. तु लग्नाला तयार झाली नाही तर मी काहीतरी जीवाचे बरेवाईट करून घेईन.तुइयाशिवाय मी राहूच शकत नाही.असे म्हणताच पिडीतेने त्याला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तो बहिणीच्या मोबाईलवर फोन करून त्रास देत होता. त्याने आक्टोबर 2022 मध्ये लग्न कर म्हणून स्वतःचा हात ब्लेडने कापून घेतला व मी मरणार असल्याची धमकी देवू लागला.लॉकडाऊनमध्ये पिडीता ही गावाकडे रहाण्यास गेल्यावर आरोपीने पिडीतेच्या गावी जावून तीचा वाढदिवस साजरा केला व चल आपण लग्न करू या असे म्हणून शरीर सुखाची मागणी करू लागला.
त्यावेळी पिडीतेने नकार देत समजावून सांगून आरोपीला पाठवून दिले. दि.13 मार्च 2023 रोजी पिडीता ही पोलिस भरतीला नायगाव-मुंबई येथे गेल्यावर सोलापूरला येण्यास सांगितले.
आरोपीने सोलापूर येथे जावून पिडीतेला मोटर सायकलवर घेवून तांडोर येथील एका ऊसाच्या फडात रात्री 11.00 वा. नेवून तुइयासोबत लग्न करणार आहे असे म्हणून विश्वासात घेवून शरीर संबंध ठेवले. तदनंतर दुसर्या दिवशी पिडीतेला मंगळवेढा येथे पाठविले.
दुसर्या दिवशी लग्नाबाबत पिडीतेने विचारले असता बोलण्यास टाळाटाळ करून पिडीतेचा नंबर ब्लॉक केला. दि.25 जून 2023 रोजी आरोपीने स्वतःची चूक कबूल करून भेटण्याची विनंती केली. व मरवडे येथे भेटण्यास बोलावले.
सायंकाळी पाचच्या दरम्यान एका शेतात नेवून तुइयाशी लग्न करायला तयार आहे असे म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने फिर्यादीकडून बर्याच वेळा पैसेही मागून घेतले होते. 13 नोव्हेंबर 2023 रोजी पिडीता ही पुण्याला पोलिस भरतीसाठी निघाल्यावर आरोपीने सोबत येवून पुण्यात लॉज बुक करून लॉजवर रहायला नेले.त्यावेळी पिडीतेची संमती नसताना शरीर संबंध ठेवले.
नंतर लग्नाबाबत विचारल्यावर टाळाटाळ केली.तदनंतर फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11.00 वा. मंगळवेढयातील रुमवरून गाडीवर बसून बोराळे रोडवर शेतात नेवून शारिरिक सुखाची मागणी केली.यावेळी नकार दिला असता आरोपीने मारहाण केली.
पिडीता ही रडत असताना तीच्या संमतीविना जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. अशा अवस्थेत पिडीतेला रूमवर आणून सोडले.ती रात्रभर झोपली नाही.लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारिरिक संबंध ठेवून लग्न करण्यास टाळाटाळ केली. मी तुइयासोबत लग्न करणार नाही तु केस जरी दाखल केली तरी मला काही फरक पडणार नाही.
तक्रार केली तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून हाकालून दिले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत पिडीतेने म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. पिडीतेच्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम 376(2) (एन),323,504,506 प्रमाणे आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज