टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुका प्राथमिक संघाचा दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नंदेश्वर- बंडगरवाडी या जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक दयानंद चव्हाण यांना जाहीर झाला आहे.
उद्या रविवारी दि.10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून राज्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.
याप्रसंगी माजी चेअरमन उत्तमराव जमदाडे, गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, कार्यकारी अध्यक्ष प्रदीप आवताडे, चेअरमन राजाभाऊ यादव, जिल्हा संघ अध्यक्ष वीरभद्र यादवाड, कोषाध्यक्ष राजकुमार खाडे, कार्याध्यक्ष संतोष जाधव,
महिला आघाडी अध्यक्ष सरस्वती भालके, शिक्षक नेते रावसाहेब जाधवर, शिक्षक नेते सिद्धेश्वर धसाडे, महिला आघाडी सरचिटणीस अंबुताई इपाते आदीजन उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज