टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील पंढरपूर बायपास जवळ छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या विकास उर्फ विक्या भिमश्या भोसले (वय ५५, रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा) यास
बुधवार, दि.२४ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरच्या पथकाने अटक केली असून त्याच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. हरीदास थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मंगळवेढा येथील पंढरपूर बायपास जवळ छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या
२०० मीटर अंतरावर एक इसम देशी बनावटीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगून असून तो विक्रीसाठी थांबला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सदर ठिकाणी दि.२४ रोजी ६.४० च्या दरम्यान त्या इसमास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव विकास उर्फ विक्या भिमश्या भोसले (वय. ५५, रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याने
विक्री करता देशी बनावटीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आणली असल्याचे सांगितले. त्याच्या विरोधात
भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, ७, २५ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली असून संशयित आरोपीस अटक करून गुरुवार, दि.२५ रोजी न्यायालयासमोर हजर केले. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज