टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे जावयाने सासरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महेश सुरेश केदार (वय 35) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कामती पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की महेश सुरेश केदार ( रा. डोणज ता. मंगळवेढा) यांचे प्रियंका विजयकुमार दसाडे (रा.कोरवली ता.मोहोळ) यांच्याशी पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर ते दोघे सोलापूर येथे राहत होते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात महेश यांचा अपघात झाला होता. अपघातानंतर तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. अपघातानंतर त्याला नैराश्य आले होते. त्यामुळे तो सतत दारूच्या नशेत असायचा.
दारू न पिण्याबद्दल घरच्यांनी व नातेवाईकांनी त्याला खूप समजावून सांगितले पण तो कोणाचेही ऐकत नव्हता.या दारूच्या व्यसनाधीनतेमुळेच पत्नी प्रियंका ही एक वर्षापासून माहेरी कोरवली येथे राहत होती.
शुक्रवारी मयत महेश केदार हा पत्नीला भेटण्यासाठी कोरवली येथे आला होता. दरम्यान सकाळी 5:45 च्या सुमारास शंकर बाबुराव दसाडे यांच्या शेतात दारूच्या नशेत चिंचेच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज