टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुका होण्यासारखी परिस्थिती आहे. एक निवडणूक लढणं पक्षाला आणि उमेदवारालाही अवघड असतं. मात्र तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याचंही पाटलांनी म्हटलं आहे. पाटलांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
दरम्यान, शिवसेनेनं पुन्हा भाजपसोबत यावं मात्र ते काही येत नाही त्यामुळे राष्ट्रवादीने एनडीएत सहभागी व्हावं, असा सल्ला रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला होता.
‘भाजपने कोणाबरोबर सत्ता स्थापन करावी अशीही परिस्थिती नाही. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार,’ अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पाटील यांनी मध्यावधी निवडणूक होण्याची भविष्यवाणी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
तर भाजपाचे नेते सकाळी स्वप्न पाहतात आणि बोलतात, आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, जे सत्तेसाठी भाजपात गेले होते, ते सध्या अस्थिर आहे, ते सत्ताधारी नेत्यांच्या संपर्कात आहे, त्या लोकांना आशेवर ठेवण्यासाठी भाजपा नेते बोलत असतात.
भाजपामधून ज्यांना बाहेर पडायचं त्यांना रोखण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. भाजपातील अनेक नेते सत्ताधारी पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रवादीतून जे जे लोक गेले त्यातील बरेच लोक पुन्हा परतण्याच्या स्थितीत आहे असा पलटवार राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर केला आहे.
मुख्यमंत्र्यांनाही ‘त्या‘ भेटीची कल्पना – राऊत
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतानाच या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.
आदित्यला अडचणीत आणणाऱ्यांसोबत जायचे कशाला?; शिवसेनेतील सूर
ज्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांनी अडचणीत आणले, मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेत दिसत आहे.
महाविकास आघाडीत चलबिचल
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यातील शनिवारच्या ‘लंच पे चर्चा’वरून महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पंचतारांकित हॉटेलात फडणवीस आणि राऊत यांच्यात शनिवारी चर्चा झाली. ही दोन तासाची ही भेट केवळ मुलाखतीसाठी होती असा खुलासा दोन्ही बाजूंनी केला. मात्र, या भेटीमुळे नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होणार का, शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा जवळीकीचे प्रयत्न सुरू आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पवार यांनीही फडणवीस-राऊत भेटीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
सरकार
पडेल तेव्हा बघू – फडणवीस
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार आहे. ते कोसळेल तेव्हा पयार्याबाबत विचार करू. मात्र, आम्हाला सरकार बनविण्याची घाई नाही. शिवसेनेसोबत कसलीही राजकीय चर्चा नाही. राऊत यांच्याशी भेट केवळ मुलाखतीसंदर्भात होती. कोरोनासह विविध कारणांमुळे राज्यातील सरकारविरोधात नाराजी आहे. लोकांमध्ये इतका आक्रोश असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे ‘त्या’ भेटीचे टायमिंग चुकल्याचे म्हणता येईल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगितले.
The situation of holding mid-term elections in Maharashtra, claims this big leader of BJP
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज