टीम मंगळवेढा टाईम्स ।
परंपरेप्रमाणे आषाढी वारीला संत दामाजीपंत यांची पालखी १६ जुलै रोजी मानकरी कै. सिध्देश्वर माळी यांच्या घरी मुक्कामास गेली होती. २० जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम होता.
मंगळवार दि.२० जुलै रोजी दुपारी शहरातून प्रदक्षिणा घालून दामाजी चौकातून पंढरपूरकडे रवाना झाली.
मंगळवेढ्यातुन पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना प्रयाग इलेक्ट्रॉनिक्सचे मालक भीमराव इंगळे, काका डोंगरे यांनी महाप्रसाद वाटप केला.
महादेव मंदिर व पुढे सावंजी मळ्यात महाप्रसाद घेऊन आरती करण्यात आली. ऐतिहासिक खाऱ्या वड्यातून पालखी माघारी परतली. नंतर पालखी संत दामाजी मंदिरात विसावली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे आषाढीला संत दामाजी पंतांचा पालखी सोहळा गावाच्या सीमेजवळून परत येत आहे.
पालखीसोबत संत दामाजीपंत मंदिर ट्रस्टी अध्यक्ष विष्णुपंत आवताडे , दिंडी प्रमुख बजरंग माळी , वीणेकरी ठोंबरे , सतीश पाटील , धनंजय नांदरेकर , मारुती भगत , तानाजी चोपडे , मल्लिकार्जुन राजमाने , दामाजी संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव जावळे , दीनानाथ नांदरेकर , धनाजी देवकर आदी उपस्थित होते.
संत दामाजी पंतांच्या पालखीसोबतच्या अश्वाचा मान चार पिढ्यांपासून अनिल रत्नपारखी यांच्याकडे असतो.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज