टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर गावचे सरपंच विनायक यादव यांच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराचे उद्घाटन संजीवनी हॉस्पिटल अँड.आयसीयूचे प्रमुख डॉ.विवेक निकम यांच्या हस्ते होणार आहे.
सदर शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सर्पदंश, विंचू दंश, दमा, टीबी, फुफ्फुसाचे आजार, मेंदू विकार, थायरॉईड ग्रंथीचे विकार,
पोट व किडनीचे विकार, कावीळ, संधिवात / आमवात, विषबाधा, एचआयव्ही निदान व उपचार, शस्त्रक्रिया पूर्व वैद्यकीय तपासणी आधी सुविधा मोफत देण्यात येणार आहेत.
या शिबिरात संजीवनी हॉस्पिटलचे डॉ.विवेक निकम, डॉ.अतुल निकम, डॉ.रोहिणी निकम, माने हॉस्पिटलचे डॉ.सदानंद माने, डॉ.वसुधा माने, डॉ.सुशांत माने,
डॉ.धवल आवताडे, डॉ.तृषाल यादव, डॉ.दौला ठेंगील, डॉ.नितीन आसबे, डॉ.मंजिरी आसबे डॉ. रवींद्र गायकवाड व डॉ.विजय लवटे हे तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र मंगळवेढ्याचे डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.
या मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन आज रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूरच्या भव्य प्रांगणात केले आहे.
या शिबिरानंतर महाराष्ट्र शासन नियम अंतर्गत व महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत मोफत ऑपरेशनची सोय करण्यात आली आहे. तरी मारापूर परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज