टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण हे केवळ शिवसेना, शिंदे गट आणि भाजप पक्षापर्यंतच मर्यादित होते.पण आता नवा ट्विस्ट यामध्ये आला आहे.
शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसाकाठी वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही गळती लागणार हे पहावे लागणार आहे. कारण माढ्याचे आ. बबनदादा शिंदे आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत्या पण आता भेट घेतल्यानंतर प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार का हे पहावे लागणार आहे.
राजन पाटील हे माजी आमदार तर बबनदादा शिंदे हे माढा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या या भूमिकेनंतर सोलापूरच्या राजकारणाचे चित्र काय समोर येणार हे पहावे लागणार आहे.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारीवर आहेत.
या दरम्यानच्या काळातच महाराष्ट्र सदनामध्ये राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठीता सिलसिला सुरु झाला आहे. शपथविधी सोहळा पार पडताच जालन्याचे अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. असे असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघाचे आ. बबनदादा शिंदे आणि
माजी आ. राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे दोन राष्ट्रवादीचे नेते आता भाजपात प्रवेश करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगलेली होती. सत्तांतरानंतर चर्चा अधिक जोर धरु लागल्याने पाटील हे भाजपात सहभागी होणारच असेच वातावरण निर्माण झाले होते.
असे असतानाच बबनदादा शिंदे आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने आता भाजपात प्रवेश करुन या चर्चांना ते पूर्णविराम देणार का हे पहावे लागणार आहे. मात्र, कोणत्या मुद्द्यावर नेमकी चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही.
बबन शिंदे यांचे माढा मतदार संघात तर राजन पाटील यांचे मोहोळ मतदार संघात राजकीय वजन आहे. शिवाय हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे असून गेल्या काही दिवसांमध्ये यांच्यात नाराजी आहेत.
त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. आता थेट दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांचीच त्यांनी भेट घेतल्याने बंद दरवाज्यात काय चर्चा झाली ते पहावे लागणार आहे.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज