टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६८.९७ टक्के मतदान झाले होते. मात्र शहरात रात्री आठ वाजेपर्यंत मतदानाची रांग होती.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ४४७ मतदारांनी गृह मतदान केले. यात ८५ वर्षांवरील ४०९ मतदारांचा तर ३८ दिव्यांग मतदारांनी मतदान केले.
१८ नोव्हेंबर २०२४ रोजीपर्यंत विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या १ ९५६ अधिकारी कर्मचारी यांनी टपाली मतदान केले आहे.
सकाळी साडेदहाच्या सुमारास अरिहंत पब्लिक स्कूल येथील मतदान केंद्रावर किरकोळ वाद झाला. याठिकाणी भगिरथ भालके यांनी भेट दिली.
उपजिल्हा रुग्णालय परिसरात रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. याठिकाणी लाइट बंद होती. मतदान यंत्रदेखील बंद होते. पुन्हा त्या ठिकाणी सुरळीत मतदान सुरू करण्यात आले.
पंढरपूर विधानसभा संघात १ लाख ९१ हजार ४६४ पुरुष मतदार तर १ लाख ८२ हजार १९४ स्त्री मतदार व इतर मतदार २६ असे एकूण ३ लाख ७३ हजार ६८४ मतदार आहेत.
यापैकी १ लाख ३४ हजार २४८ पुरुष मतदार तर १ लाख २३ हजार ४३३ स्त्री मतदार व इतर मतदार ९ असे एकूण २ लाख २७ हजार ७२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल..
एका कार्यकत्यनि मतदान करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र याची दखल घेत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. त्या मतदान केंद्रावर भेट दिली असता, संबंधित कार्यकत्याने सोशल मीडियावरचे फोटो डिलिट केले व त्याने मोबाइल संपर्क क्षेत्राच्या बाहेर ठेवला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज