टीम मंगळवेढा टाईम्स ।
एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्लीत 16 एप्रिलला लोकसभा निवडणुका होणार असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल ठरल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचा निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे. त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे.
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEOs) पाठवलेल्या परिपत्रकात 16 एप्रिल 2024 ही लोकसभा निवडणुकीची तात्पुरती तारीख ठरवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ‘आयोगाने 16 एप्रिल 2024 हा मतदानाचा दिवस म्हणून तात्पुरता नियुक्त केला आहे.’
हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यामुळे निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. त्या माध्यमातून 16 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज