mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी; सोलापूरचे तिकीट कोणाला मिळणार? माढ्याचा उमेदवार कोण? उमेदवारांची यादी आली समोर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 6, 2024
in राजकारण, राज्य, सोलापूर
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर मंगळवारी रात्री भाजपच्या गोटातून महाराष्ट्रातील संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी समोर आली असल्याचे वृत्त tv9 मराठीने प्रसिध्द केले आहे.

उमेदवारांची निवड करताना भाजप नेतृत्त्वाकडून धक्कातंत्राचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपने लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

भाजपच्या 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक बड्या नेत्यांचा आणि मंत्र्यांचा समावेश होता. मात्र, यामध्ये नितीन गडकरी यांचे नाव का नाही, असा प्रश्न अनेकांना उपस्थित केला होता. पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने भाजप त्यांचा पत्ता कापणार का, अशी चर्चाही सुरु झाली होती.

भाजपच्या महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांच्या यादीत नागपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. यादीत नमूद केल्याप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांनाच पुन्हा संधी दिली जाईल. त्यामुळे गडकरी समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे.

तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपकडून राज्याचे वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, सातत्याने चर्चेत असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातूनही विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. या जागेसाठी भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील इच्छूक होते. परंतु, भाजप नेतृत्त्वाने रणजितसिंह निंबाळकर यांच्याच पारड्यात दान टाकले आहे.

तर सोलापूरच्या जागी सिद्धेवर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्या संभाव्य 32 लोकसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे

1. पुणे : मुरलीधर मोहोळ

2. धुळे : सुभाष भांबरे यांच्याऐवजी प्रदीप दिघावकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.

3. हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपच्या तानाजी मुरकुटे यांना संधी मिळण्याची शक्यता.

4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.

5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवले जाण्याची शक्यता.

6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.

7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.

8. अकोला : संजय धोत्रे

9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक

10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.

11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.

12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे

13. बीड : विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे

14. माढा – रणजितसिंह निंबाळकर

15. गडचिरोली : अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपच्या चिन्हावर लढू शकतात.

16. भिवंडी : कपिल पाटील

17. सांगली : संजयकाका पाटील यांच्याऐवजी काँग्रसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.

18. सातारा : उदयनराजे भोसले

19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील.

20. दिंडोरी : भारती पवार

21. रावेर : अमोल जावळे

22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय)

23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.

24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.

25: उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.

26. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र, भाजपा घेण्यास आग्रही आहे )

27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरीसिंधुदुर्गमध्ये अजूनही वाद सुरु आहे. शिंदे गटाकडून किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत )

28. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर

29. नांदेड : मिनल खतगावकर (अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली )

30 . राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत. मात्र, ते भाजपा पक्षप्रवेश करून भाजपा तिकीटावर लढतील अशी शक्यता आहे.

31. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.

32. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्षप्रवेश होईल. मात्र, नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हेदेखील आग्रही आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भाजप लोकसभा निवडणूक

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
Next Post
मोठी बातमी! पंढरपूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; गाडीचा मंगळवेढ्यात अपघात, एका मुलाचा जागीच मृत्यू; ७ जण गंभीर जखमी

दुर्दैवी घटना! सांगोला रस्त्यावर कारची मागून धडक, मंगळवेढ्यातील दुचाकीस्वार जागीच ठार

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा