टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील तांडोर व तामदर्डी येथील मोकाअंतर्गत कारवाईमधील गेल्या दोन वर्षापासून फरारी असलेले वाळू माफिया दरोडेखोर अमित शरणाप्पा भोसले (वय.32),सुरज उर्फ सपर्या शरणाप्पा भोसले (वय.25) दोघे रा.मिरी ता.मोहोळ जि.सोलापूर मुळ रा.तामदर्डी ता.मंगळवेढा जि.सोलापूर यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.23.04.2018 रोजी पहाटेच्या वेळी तांडोर ता. मंगळवेढा शिवारात वाळूचे साठा केलेल्या ठिकाणी कारवाई करणेकामी विशेष पथक गेले असताना यातील आरोपीत मजकूर यांनी पोलीस पथकास चिथावणी देवून शिवीगाळी दमदाटी करून पोलीसांच्या अंगावर वाळूचा ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून पोलीसांनी पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर ट्राॅली बळजबरीने घेवून गेले
व स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता दांडपट्टयाने धमकावून हवेत वार करून जवळ येण्यास मज्जाव करून सरकारी कामात आडथळा निर्माण केले म्हणून फिर्यादी पोलीस शिपाई सुरेश सुधाकर लामजाणे, नेमणूक विशेष पथक सोलापूर ग्रामीण यांनी फिर्याद दिल्याने ती मंगळवेढा पोलीस ठाणे गुरंन 139/2018 भादविसंक 395,353,308 आर्म अॅक्ट 4 (25), मोक्का कायदा कलम 3(1)(2),3(2),3(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर जिल्हयातील बेकायदेशिर वाळू तस्करीबाबत आढावा घेवून त्यात शासकीय अधिकारी व कर्मचारी व पोलीस पथकावर हल्ला करणा-या गुन्हेगारांना पकडून कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि रवींद्र मांजरे यांचे पथक तयार करण्यात आले होते.दि.9 फेब्रुवारी 2021 रोजी स्थानिक गुन्हे षाखेचे पथक पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोध घेणेकामी कामती पोलीस ठाणे हद्दीत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत माचणूर ता. मंगळवेढा येथे असताना तांत्रिक विश्लेशणावरून माहिती मिळाली की, मंगळवेढा पोलीस ठाणेकडील मोका गुन्हयातील पाहिजे असलेले दोन आरोपी हे मिरी ता. मोहोळ शिवारातील एका शेतामध्ये असल्याचे समजले.
त्याप्रमाणे मिळालेली माहिती ही वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सपोनि रवींद्र मांजरे व त्यांचे पथक कारवाई करण्याकरीता रवाना झाले. मिरी ता. मोहोळ येथील बातमीच्या ठिकाणी ऊसाच्या शेतातील बांधावर दोन इसम संशयितरित्या मिळून आले.
त्यांच्या पैकी एका इसमाच्या कंबरेस दांडपट्टासह हत्यारबंध अवस्थेत मिळून आला. मिळून आलेले दोन्ही इसम हे मंगळवेढा पोलीस ठाणेच्या मोक्यातील फरारी आरोपी असल्याचे खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेतले.
सदर आरोपी हे मोका सारख्या गंभीर गुन्हयात फरारी असतानाही त्यांनी त्यांचे इतर साथिदारासह मंद्रुप पोलीस ठाणेच्या हद्दीत स्वस्तात सोने देण्याचे बहाणा करून बोलावून घेवून त्यांना मारहाण करून त्यांचेकडील रोख रक्कम व तीन मोबाईल जबरीने काढून घेतलेबाबत मंद्रुप पोलीस ठाणेस फिर्याद दिल्याने मंद्रुप पोलीस ठाणे गुरंन 301/2020 भादविसंक 395, 397 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचे दोन्ही आरोपी सदर गुन्हयात निश्पन्न पाहिजे असलेले आरोपी आहेत.
तसेच मंगळवेढा पोलीस ठाणे गुरंन 84/2018 भादविसंक 379,353,308 वगैरे मध्येही निश्पन्न पाहिजे असलेले आरोपी आहेत.
सदरचे दोन्ही आरोपी हे रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचे विरूध्द मोका, दरोडा,वाळू चोरीे, शासकीय नोकरावर हल्ला अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी साततपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहा.पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस हवालदार/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार/ धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज