मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राजकारणात दिलेला शब्द पाळला नाही म्हणून अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र त्याला अपवाद लक्ष्मीदहिवडी या मंगळवेढा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुजाता शिंगाडे ठरल्या आहेत.

त्यांनी ठरलेला कार्यकाळ पूर्ण होताच हलग्या लावून वाजत गाजत आपला राजीनामा ग्रामपंचायत प्रशासनाकडे सादर केला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

सन २०२३ ला लक्ष्मीदहिवडी ग्रामपंचायतची ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. त्यावेळी अनिल पाटील यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली होती.

त्या निवडीनंतर उपसरपंचाच्या निवडणुकीत सदस्यांच्या समझोत्यातून दोन वर्षासाठी सुजाता बजीरंग शिंगाडे यांना उपसरपंचपदी बसवले होते.
त्यांच्या दोन वर्षाचा कार्यकाळ शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पूर्ण झाला म्हणून स्वखुशीने आनंदात हलग्या फटाके वाजवत राजीनामा दिला.

यावेळी धनगर समाजाकडून सुजाता शिंगाडे व पती बजीरंग शिंगाडे यांचे समाजाच्या वतीने मनाचा फेटा व शाल देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मच्छिंद्र सरकार, ग्रा.प. सदस्य प्रकाश जुंदळे, महेश स्वामी, दत्ता कोळेकर, दादा गायकवाड, मनोहर लिगाडे आदी उपस्थित होते.

राजीनामा देणार असल्याची माहिती सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आली असतानाही राजीनामा स्वीकारण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक उपस्थित राहिले नाहीत,
याची खंत उपसरपंच सुजाता शिंगाडे यांनी व्यक्त केली व राजीनामा ग्रामपंचायत कार्यालयात लिपिकाकडे सुपूर्द केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










