टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराच्या वैभवात भर घालणारे हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट सोलापूर रोडवरील आजपासून मंगळवेढेकरांच्या सेवेत रुजू होत असल्याची माहिती हॉटेल सुगरणचे संचालक डॉ.संतोष मेटकरी व वैभव खांडेकर यांनी दिली आहे.
मंगळवेढा-सोलापूर रोडवर नव्याने सुरू होत असलेल्या ‘हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’ ग्राहकांच्या सेवेसाठी आजपासून सुरू होत आहे.
हॉटेल सुगरणची परंपरा की गेल्या कित्येक वर्षापासून सर्वांच्या सेवेत रुजू आहे. हा हॉटेलचा परिसर अतिशय नयनरम्य निसर्ग रम्य आहे.
हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटमध्ये पिव्हर व्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळणार असून , खास चुलीवरील भाकरी, भरलं वांग , पिठल पालेभाजी, व्हेज भुना , पनीर पसंदा , व्हेज कढाई , ताक व इतर प्रकारचे खाद्यपदार्थ हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हॉटेलची संपूर्ण इमारतमध्ये आकर्षक रंगसंगती सजावट, नैसर्गिक वातावरण , उत्तम आसन व्यवस्था, भव्य परिसर व पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास डॉ.संतोष मेटकरी यांनी व्यक्त केला.
आज मंगळवेढेरांनी हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थितीत राहावे असे आवाहन डॉ.संतोष मेटकरी व वैभव खांडेकर यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज