टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील बँकेस तारण दिलेली जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी कर्जदार कमालपाशा नबाब मुल्ला ( वय ४६ ) व जामीनदार सलीम नबाब मुल्ला ( वय ३८ , दोघे रा . मंगळवेढा ) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजमाता अर्बन को बँकेचे विशेष वसुली अधिकारी गणपतराव सिद्धारामप्पा दनुरे (वय ५४ रा.अक्कलकोट ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजमाता अर्बन को- ऑप. बँकेकडून थकीत कर्जदार कमालपाशा नबाब मुल्ला यांना कॉन्ट्रॅक्टर व्यवसायासाठी सीसीएचवाय कर्ज मिळाले. १० एप्रिल २००७ रोजी ५ लाख रुपये दिले होते .
कर्जासाठी तारण म्हणून त्यांनी स्वमालकीची शेतजमीन बँकेस तारण दिली होती. या मिळकतीवर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांच्याकडून ३० जाने.
२०१३ रोजी जप्ती बोजा नोंद करण्यात आला आहे. तसेच कमालपाशा मुल्ला यांना ३१ मार्च २००६ रोजी ठेकेदार व्यवसाय व शेती सुधारणेसाठी टर्म लोन म्हणून ९ लाख ५० हजार रुपये मंजूर करून दिले होते.
कर्जास जामीनदार म्हणून कर्जदाराचा भाऊ सलीम नबाब मुल्ला यांनी ती मिळकत रजिस्टर गहाणखताने तारण दिली आहे.
या मिळकतीवर बँकेचे व विशेष वसुली अधिकारी यांच्याकडून जप्ती बोजाही नोंद करण्यात आली होती.
दोन्ही तारण मिळकतीवर वसुलीसाठी कायदेशीर कारवाई चालू असताना दोन्ही मिळकती बँकेची संमती न घेता जमीन बेकायदेशीररीत्या विक्री केल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज