मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर शहरात जुळे सोलापूर पंढरपूर अर्बन बँक शेजारी, शिवदारे कॉलेज रोड, दावत चौक येथील नव्याने शाखा स्थापन होणाऱ्या लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा
आज रविवार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव बिराजदार गुरुजी व चेअरमन सौ. सुरेखा अप्पाराया कपले यांनी दिली आहे.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील व जुळे सोलापूर परिसरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, सर्व बँकांचे चेअरमन, अधिकारी आदीजन उपस्थित राहणार आहेत.
आज होणाऱ्या लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हा.चेअरमन सौ.शैलजा बाळासाहेब बिराजदार, सरव्यवस्थापक अप्पाराया कपले व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
दामदुप्पट ठेव योजना
नागरिकांना लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये 6 वर्ष 6 महिन्यात या अत्यंत अल्पकाळात दामदुप्पट रक्कम मिळणार आहे.
ठेवींवर आकर्षक व्याजदर
नागरिकांना 30 दिवसाच्या ठेवींवर 7 टक्के, 46 दिवसाच्या ठेवींवर 8.5 टक्के इतके व्याजदर दिले जाणार आहे तर 6 महिने ते 1वर्षा पर्यंत 10 टक्के तर 1 वर्षाच्या पुढे 11 टक्के व्याजदर दिले जाणार आहे. तर 24 महिन्यांच्या ठेवीवर 12 टक्के व्याजदर दिले जाणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे.
कन्यारत्न ठेव योजना
आपल्या मुलींच्या भविष्यासाठी 1 लाख रुपये भरा व 18 वर्षानंतर 7 लाख रुपये नागरिकांना मिळणार आहेत.
मासिक प्राप्ती ठेव योजना
1 लाख रुपये 24 महिन्यांसाठी ठेवा व प्रतिमाहिना 1000 रुपये मिळवा ही आकर्षक योजना सुरू करण्यात आली आहे.
लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली जाणार आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा, व्यावसायिक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज