मंगळवेढा टाईम्स न्युज ।
सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीच्या तगाद्यामुळेच विवाहितेने आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यावरून कुरुंदवाड शहरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय ३१) व जाऊ समिना इलहान गरगरे (वय २८, दोघेही रा. कुरुंदवाड) या दोघा आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणातील सासू मुमताज गरगरे व सासरा राजमहंमद गरगरे यांना अटक झाली नव्हती. कौसर गरगरे हिने गुरुवारी (दि. २०) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.

कौसर हिच्या माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका उपस्थित केल्याने दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. यावेळी घातपाताच्या संशयावरून मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका माहेरकडील लोकांनी घेतली होती.

दरम्यान, मृताचा भाऊ अलताफ आवटी (रा. जयसिंगपूर) याने पतीसह सासू, सासरा व जावेविरूद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पतीच्या व्यवसायाकरिता व सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, अशा मागणीचा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून कौसरने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














