टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे आज सकाळी आकस्मिक निधन झालेल्या वडीलाचा मृतदेह घरात ठेवून मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला बारावीच्या परीक्षेसाठी पाठवले, पेपर संपल्यानंतर वडिलांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील हुलजंती येथील कल्लाप्पा आबा रूपटक्के (वय 60) यांचे अकस्मात काल स.8 वाजता निधन झाले.
त्यामुळे घरात दुःखाचा डोंगर पसरला अशा परिस्थितीत सर्व नातेवाईक दुपारच्या सत्रात अंत्यविधी करण्यासाठी जमा झाले.
दरम्यान मुलगा तुकाराम याचा बारावी गणित विषयाचा आज पेपर सोड्डी येथील एम.पी मानसिंगका विद्यालय येथे असल्याचे समजले त्यामुळे या दुःखद प्रसंगी
वडिलांच्या निधनामुळे पेपरला गैरहजर राहून त्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हुलजंती येथील गोविंद भोरकडे व ग्रामस्थांनी एकत्र येत त्याला परीक्षेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.
त्याबाबत प्राचार्य बसवराज कोरे यांना हा प्रकार कानावर घातला त्याचा बारावीचा पेपर होईपर्यंत वडिलांचा अंत्यविधी दुपारी दुपारपर्यंत पुढे ढकलण्यात आला.
त्यामुळे वडिलांचा मृतदेह घरात ठेवून जड अंतकरणाने त्याला परीक्षेसाठी जावे लागले. या घटनेने या परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज