टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलीस असलेल्या पतीने पोलीस पत्नीच्या त्रासाला कंटाळून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जीवन संपविले होते. या प्रकरणी संशयित पत्नीला अटक केली होती.
तिला काल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भार्गवी भोसले यांच्या न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
धनश्री बाळासाहेब मांढरे असे या संशयित महिला पोलिसाचे नाव आहे. धनश्री हिचा मित्र संशयित हवालदार शिंदे सध्या फरार झाला आहे.
तर मृत आकाश तोगे असे पतीचे नाव आहे. या प्रकरणी मृत आकाश तोगे याचा भाऊ सुरज अभिमान तोगे (वय २७, रा. घोळवेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर, हल्ली मुक्काम भानूनगर, धाराशिव) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
आकाश तोगे यांनी बुधवारी रात्री भाड्याच्या घरामध्ये जीवन संपवले होते. मृताचा भाऊ सुरज तोगे (वय 27) यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, धनश्री आणि तिचा साथीदार शिंदे यांच्या मारहाण आणि धमकीला कंटाळून आकाश तोगे याने टोकाचे पाऊल उचलले.
त्यामुळे संशयित आरोपी म्हणून धनश्री मांढरे तसेच शिंदे यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज