मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा किंवा टिकली लावणे, विद्यार्थिनींनी हातात बांगड्या घालणे तसेच विद्यार्थ्यांनी राखी अथवा धागा बांधणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
शाळा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे. कल्याणमधील प्रसिद्ध के. सी.गांधी इंग्लिश स्कूलचे नाव असून या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा प्रशासनाकडे खुलासा मागितला आहे.
टिळा लावल्यास शिक्षा
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी जर शाळेत टिळा किंवा टिकली लावून आले तर त्यांचा टिळा जबरदस्तीने पुसला जात आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांना मारहाणही करण्यात आल्याचा दावा पालकांनी केला.
विद्यार्थ्यांनी जर टिळा लावून शाळेत आल्यास त्यांना शिक्षा केली जाईल, अशी धमकीही दिली गेल्याचा पालकांचा दावा आहे.
या प्रकरणावर संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्यावर सर्व विद्यार्थ्यांना टिळा, टिकली, गंध, बांगड्या आणि राखी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली.
नोटीस, खुलासा करण्याचे आदेश
या निर्णयाविरोधात पालकांनी ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांच्याकडे तक्रार केली आहे. रुपेश भोईर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाकडे तक्रार केली.
कल्याण डोंबिवली मनपा शिक्षण विभागाने या घटनेची तातडीने दखल घेत शाळेला नोटीस पाठवून तातडीने खुलासा मागितला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज