टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुस्लिम कोया या जातीचा बनावट दाखला तयार करून एसटी महामंडळात नोकरी मिळवल्या प्रकरणी खतालसाब महमद कासीम दंडू यास तीन वर्षे कारावासाची शिक्षा
आणि १ हजार रुपयांचा दंड न्याय दंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सुनावला. बनावट दाखल्याच्या आधारे एसटी महामंडळात १९८२ मध्ये नोकरी मिळवली होती. यामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले.
आरोपीची पत्नी शकिला दंडू यांनी केलेल्या तक्रारीवरून हा खटला दाखल झाला होता. शकिला दंडू यांनी सोलापूरच्या सदर बझार पोलिसांत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने
राज्य परिवहन महामंडळाने जात पडताळणी समिती मार्फत चौकशी केल्यानंतर दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले. २७ मे २००८ रोजी पोलिसांनी फिर्याद दाखल केली.
तपास अधिकारी अनिल नलावडे यांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आरोपीच्या पत्नीसह सरकारी पक्षातर्फे जात पडताळणी अहवाल आणि ८ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या.
आरोपीने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कोया जातीचा दाखला प्राप्त केल्याचे सिद्ध झाल्यामुळे आरोपीस तीन वर्षे कारावासाची शिक्षा आणि १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज