टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा बसस्थानकावर एक 65 वर्षीय प्रवासी महिला मंगळवेढा-जत या बसमध्ये चढत असताना
35 हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरटयांनी चोरल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी प्रवासी महिला सुमन शिवाजी तरंगे (रा.नागणेवाडी) ह्या दि.4 रोजी सायंकाळी 4.00 च्या दरम्यान मंगळवेढा बसस्थानकावरून
सुटणारी मंगळवेढा-जत बस क्रमांक एम एच 14,बी.टी.3012 या क्रमांकाच्या बसमध्ये चढत असताना चोरटयांनी गर्दीचा फायदा घेवून
फिर्यादीच्या गळयातील 35 हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ व त्यामध्ये पिवळया रंगाचे ल35 मणी असे चोरटयांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेले आहेत.
याचा अधिक तपास पोलिस हवालदार हजरत पठाण हे करीत आहेत.
दरम्यान, बसस्थानकावर चोरीची घटना घडल्यानंतर चालक माळी यांनी मंगळवेढा पोलिस स्टेशनला बस आणून चोरटयाचा पोलिसांनी शोध घेतला.
मात्र बसमध्ये चोरटा सापडू शकला नाही. वारंवार बसस्थानकावर महिला प्रवाशांच्या गळयातील सोने चोरीच्या घटना घडत आहेत.
मात्र त्याचा पोलिसांना तपास लागत नसल्यामुळे चोरटयांचे बळ वाढत आहे. बसस्थानकावर आगार प्रमुखांनी मोठा सी.सी.टी.व्ही.कॅमेरा बसविला आहे.
या कॅमेरामुळे खूनासारखा प्रकारही उघड झाला आहे. मात्र बसस्थानकावर भुरटया चोर्या करणारे चोरटे मात्र पोलिसांना सापडू शकत नसल्यामुळे नागरिक तर्क वितर्क काढत आहेत.
बसस्थानकावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त नसल्याने चोरटयांचे फावत असल्याची चर्चा प्रवासी वर्गातून होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज