मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोेरे आज गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच ते सोलापूर शहराच्या दौर्यावर येत आहेत.
दुपारी त्यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्यांसमवेत विकासकामांची आढावा बैठक ते घेणार आहेत.
गोरे सातारा जिल्ह्यातील बोराटवाडी येथील त्यांच्या निवासस्थानातून सकाळी नऊ वाजता शिखर शिंगणापूरला जाणार आहेत. त्यानंतर नातेपुते मार्गे मांडवे येथे त्यांचे आगमन होईल.
पावणेअकरा माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील निवासस्थानी ते भेट देणार आहेत. त्यानंतर माळशिरस, वेळापूर, पंढरपूरमार्गे सोलापुरात दुपारी साडेतीन वाजता त्यांचे आगमन होईल.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पाच वाजेपर्यंत अधिकार्यांसमवेत विकास कामांची आढावा बैठक ते घेणार आहेत.
त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पक्षाचे पदाधिकारी, कायर्र्कर्ते आणि नागरिकांची भेट घेणार आहे. त्यानंतर सहा वाजता मोटारीने बोेराटवाडीकडे रवाना होतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज