टीम मंगळवेढा टाईम्स।
दिवाळीला लक्ष्मी घरी येते, असे म्हटले जाते, म्हणूनच दिवाळीला शुभ गुंतवणुकीची परंपरा आहे.
गुंतवणूकीबाबत बोलणं होते तेव्हा इक्विटी हा एक चांगला पर्याय समोर येतो. बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी करु शकतात. दिग्गजांकडून जाणून घेऊयात कोणते आहेत हे शेअर्स…
एमओएफएसएलचे (MOFSL) हेमांग जानी , युनायटेड स्पिरिट्सचे (UNITED SPIRITS) शेअर्स घेण्याचा सल्ला हेमांग जानी यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी 1005 रुपयांचे टारगेट दिले आहे, दिवाळीत कंपनीची विक्री वाढण्याची शक्यता आहे.
लिकरच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये चांगली वाढ झाली आहे. हे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये ठेवल्यास चांगला नफा मिळेल असेही ते म्हणाले.
जिओजित फायनान्शियलचे (Geojit Financial) गौरंग शाह गौरंग शहांनी रिलायन्स इंडमध्ये (RELIANCE IND) गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंत हे शेअर्स 3000 रुपयांची पातळी गाठू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कंपनीने नुकतेच स्वच्छ, हरित ऊर्जेत (clean, green energy) पाऊल टाकले आहे. त्यांचे तेल-वायू, डिजिटल, रिटेल, टेलिकॉम व्यवसाय उत्कृष्ट आहे. शिवाय, नवीन व्यवसायाचा परिणाम कंपनीच्या बॅलेन्सशीटवर दिसून येईल असेही शाह म्हणाले.
एयूएम कॅपिटलचे (AUM Capital) राजेश अग्रवाल , राजेश अग्रवाल यांनी ग्रासिममध्ये (GRASIM) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत हे स्टॉक्स 2100 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. त्यांची उपकंपनी अल्ट्राटेकमध्येही चांगली वाढ होते आहे. रंगव्यवसायात येणेही फायदेशीर ठरले आहे.
बाजार तज्ज्ञ सुदीप बंदोपाध्याय
सुदीप बंदोपाध्याय यांनी एनटीपीसीमध्ये (NTPC) गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत हे शेअर्स 200 रुपयांपर्यंत जातील असा विश्वास असल्याचे बंदोपाध्याय म्हणाले. सरकारी कंपन्या पुढे आणखी चांगली कामगिरी करतील. कंपनीचे मूल्यांकन (Valuation) अतिशय स्वस्त आहे. ही देशातील सर्वोच्च वीज निर्मिती कंपनी आहे. कंपनी क्लीन एनर्जीमध्ये उतरली आहे. FY32 पर्यंत 60 जीबी वीज निर्मिती करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.
अरिहंत कॅपिटलचे (Arihant Capital) आशिष माहेश्वरी
आशिष माहेश्वरी यांनी भारती एअरटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. पुढच्या दिवाळीपर्यंत हे स्टॉक्स 1000 रुपयांपेक्षा जास्त पातळी गाठतील. राइट्स इश्यूनंतर भांडवलात (Capital) वाढ होईल. त्याच वेळी 4 वर्षांचे मोरेटोरियम मिळाल्यामुळे रोख वाढेल. दूरसंचार क्षेत्राचा बाजार हिस्सा 30 टक्के आहे. कंपनी यावर्षी जोरदार नफा दाखवेल असा विश्वास माहेश्वरींनी व्यक्त केला.
ट्राकॉम स्टॉक ब्रोकर्सचे (Tracom Stock Brokers) पृथ्वी शहा
पृथ्वी शहा यांनी एनओसीआयएलमध्ये (NOCIL) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत स्टॉकमध्ये 340 रुपयांची पातळी दिसू शकते. कंपनीची क्षमता दुप्पट झाली आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत या क्षमतेचा विस्तार केला जाईल. जागतिक कंपन्या या कंपनीला ऑर्डर देत आहेत ज्याचा कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीवर परिणाम होईल अशी माहिती शहा यांनी दिली.
दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी 16 शेअर्सची लिस्ट
भारतीय ब्रोकरेज आणि रिसोर्स फर्म एंजेल वनने दिवाळीसाठी 16 शेअर्सची निवड केली आहे.
भारतीय ब्रोकरेज आणि रिसोर्स फर्म एंजेल वनने दिवाळीसाठी 16 शेअर्सची निवड केली आहे.
जे गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंग किंवा दिवाळी दरम्यान खरेदी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही लिस्ट महत्त्वाची ठरेल. एंजल वनने दिवाळीच्या मुहुर्त ट्रेडिंगसाठी अशोक लेलँड (Ashok Leyland), पीआय इंडस्ट्रीज (PI Industries), एचडीएफसी बँक, फेडरल बँक, शोभा, स्टोव्ह क्राफ्ट (Stove Kraft), सफारी इंडस्ट्रीज (Safari Industries), एयू स्मॉल फायनान्स (AU Small Finance) यांची निवड केली आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील एंजल वनने निवडलेल्या स्टॉक्समध्ये अशोक लेलँड (टारगेट प्राइस 175 रुपये), सोना BLW प्रिसिस (टारगेट प्राइस 775 रुपये), रामकृष्ण फोर्जिंग्स (टारगेट प्राइस 1,545 रुपये) आणि सुप्रजित इंजिनियरिंग (टारगेट प्राइस 425 रुपये) यांचा समावेश आहे.
बँकिंग क्षेत्रात, एंजेल वनने AU स्मॉल फायनान्स बँक आहे, ज्याची टारगेट प्राइस 1520 रुपये ठेवली आहे, फेडरल बँकेची टारगेट प्राइस 135 रुपये आहे, एटडीएफसी बँकेची टारगेट प्राइस 1859 रुपये, तर श्रीराम सिटी युनियनचे शेअर्स 3002 रुपयांच्या टारगेटसह खरेदी करावे असा सल्ला दिला आहे.
केमिकल सेक्टरमध्ये, ब्रोकरेजने PI इंडस्ट्रीजचा फक्त एक शेअर त्याच्या टॉप पिकमध्ये समाविष्ट केला आहे आणि 3,950 च्या टारगेट प्राइससह खरेदी करायचा सल्ला दिला आहे.
एंजल वनच्या दिवाळी टॉप निवडीमधील इतर स्टॉक्समध्ये कार्बोरंडम युनिव्हर्सल (टारगेट प्राइस 1,010 रुपये), स्टोव्ह क्राफ्ट (टारगेट प्राइस 1,288 रुपये), सफारी इंडस्ट्रीज (टारगेट प्राइस 979 रुपये), शोभा (टारगेट प्राइस 950 रुपये), व्हर्लपूल इंडिया (टारगेट प्राइस 2,760 रुपये), लेमन ट्री हॉटेल (टारगेट प्राइस 64 रुपये) आणि एंबल एंटरप्राइजेज (टारगेट प्राइस 4,150 रुपये) यांचा समावेश आहे.
या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अॅसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये (AUM)वाढ झाल्यामुळे आणि प्रोव्हिजनिंगमध्ये घट झाल्यामुळे बँकांची कमाई वाढेल आणि बँकिंग स्टॉक मार्केटचे नेतृत्व करेल असे एंजल वनने एका नोटमध्ये म्हटले आहे.
विमान वाहतूक, ग्राहकोपयोगी वस्तू, हॉटेल्स, मल्टिप्लेक्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात चांगली कामगिरी होणार असल्याचेही एंजल वनने म्हटले आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज