मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. येत्या 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो.
त्यात जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकते.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक आधी घेणं सोयीस्कर वाटत असल्याची माहिती आहे.

यासंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे.

सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज बैठक
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आलेल्या हरकती आणि अडचणींबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त उपस्थित असतील.

तर दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. यामध्ये सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज ही बैठक बोलावण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु
राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर मनपात आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे.

तुलनेत जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाचा घोळ जास्त आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.

त्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे.
प्रारुप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7452 हरकती सूचना
एका दिवसात एकूण 1958 हरकती सूचना नोंदी मुंबई महापालिकेकडे दाखल करण्यात आल्या आहेत. 3 डिसेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदविण्याचा शेवटचा दिवस होता. तर अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला जाहिर करण्यात आलेल्या प्रारुप मतदान यादीवर बुधवार 3 डिसेंबरपर्यंत 7452 हरकती सूचना नोंद झाल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












