टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात महाविकास आघाडी सरकारने सोमवार सायंकाळी ८ वाजल्यापासून ब्रेक द चेनच्या नावाखाली अघोषित लॉकडाऊन जाहीर केले असून ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे अचानक आदेश जिल्हाधीकारी सोलापूर यांनी काढल्यामुळे
सर्वसामान्य दुकानदार,छोटे व्यवसायिक,रस्त्यावरील पथविक्रेते,खाजगी कामगार यांच्यासमोर मोठे संकट उभा राहिले आहे.
शासनाच्या या आदेशाचे पडसाद जसे राज्यात उमटत आहेत तसेच ते पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात उमटत असून या संतापाची दखल घेत पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार शैला गोडसे या आक्रमक झाल्या असून शुक्रवार सकाळपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगीचे आदेश नाही काढले तर पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे शैला गोडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या तीन दिवसापासून पंढरपूर शहरात दुकाने बंद बाबतच्या आदेशामुळे व्यापारी वर्ग प्रचंड संतप्त झाला आहे.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढपुरात आहेत ते या उद्रेकाची दखल घेत काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत होती पण याबाबत ठोस असे काही व्यापाऱ्यांच्या हाती पडले नाही.
मात्र आता शहरातील छोटे मोठे व्यवसायिक आणि कामगार यांच्या संतापाची दखल घेत शैला गोडसे यांनी घेतला असून एकीकडे राजकीय नेत्यांच्या बैठकीत हजारो लोक गर्दी करतात मग सामान्य जनतेवर अन्याय का असा प्रश्न शैला गोडसे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज