टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 एप्रिल गुढीपाडवा सणाच्या दिवसापासून राज्यातील कोरोना संसर्गाचे निर्बंध उठवण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर सर्व निर्बंध उठवण्यात येणार आहेत. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवार 1 एप्रिल रोजी आदेश काढून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व निर्बंध उठवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
मात्र त्यांनी काही विषयावर गांभीर्य दाखवत सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क वापरणे इत्यादींसह कोविड योग्य वर्तन हेच व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.
१) कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत लावलेले सर्व निर्बध दि.०१.०४.२०२२ पासून लागू होणार नाहीत.
२) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण यांनी कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत लादलेले सर्व निर्बंध मागे घेण्याची कार्यवाही करण्यात यावी.
३) आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोविड १९ नियंत्रणाशी संबंधित तसेच लसीकरणाच्या संबंधीत विभागांनी केंद्रशासनाकडील गृह विभाग यांचेकडील दि.२२.३.२०२२ रोजीचे पत्र व आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाकडील दि.२३.०३.२०२२ मधील पत्रातील निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
४) सर्व नागरिक, आस्थापना व संस्था यांना सूचित करण्यात येते की, मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादींसह कोविड योग्य वर्तन हेच व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
५) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साथ रोगाच्या उद्रेकाबाबतची परिमाणे यामध्ये प्रतिदिवशी आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांची संख्या बाधित रुग्णसंख्येचा दर तसेच रुग्णालयामध्ये उपचाराधीन रुग्णांकरीता वापरात असलेल्या विविध प्रकारच्या खाटांची संख्या याबाबत दक्ष रहावे.
कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्येचा कल यावरुन साथ रोगाचा पुनश्च प्रादुर्भाव होण्याच्या स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास तात्काळ कळविण्यात यावे.
जेणेकरुन साथ रोगाचा पुनश्च प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात येतील.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज