टीम मंगळवेढा टाईम्स ।
हृदयविकार तपासणी व उपचारासाठी वापरले जाणाऱ्या अद्यावत कॅथलॅब व फिजिओ थेरपी युनिटचा आज सायंकाळी 5 वाजता महिला हॉस्पिटल व मल्टीस्पेशालिटी येथे उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती डॉ.पुष्पांजली शिंदे यांनी दिली आहे.
नामदेव विठ्ठल गायकवाड यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.शीतल शहा उपस्थित असणार आहेत.
संतांची पवित्र भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये विकासाच्या नवनवीन गोष्टी होताना दिसत आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा उपेक्षित असलेला हा तालुका हळूहळू आपली कात टाकला दिसत आहे.
दुष्काळी तालुका असूनही कसदार मातीमध्ये पिकणाऱ्या ज्वारीच्या कोठाराबद्दल प्रसिद्ध आहेच.पण आता आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
मंगळवेढा मध्ये काही डॉक्टर्स आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करून देत आहेत. त्यापैकी डॉ.पुष्पांजली शिंदे यांचे महिला हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी याचे नाव अग्रगण्य आहे.
Covid-19 च्या जागतिक महामारीच्या काळामध्ये या तालुक्याच्या नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती ऑक्सिजनची सगळीकडे कमतरता असताना पूर्ण जिल्ह्यामध्ये रुग्णांना कुठेही वेळ मिळत नसताना या हॉस्पिटलमधून अनेक रुग्णांना अत्यंत अल्प दरात दर्जेदार आरोग्य सेवा मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत.
यासाठी पश्चिम महाराष्ट्र मधील पहिल्यांदाच हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा खाजगी प्लांट याच रुग्णालयामध्ये उभा केला होता.
त्याचबरोबर याच काळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शेकडो गरोदर मातांची प्रसूती व सिजर यांची शस्त्रक्रिया अगदी मोफत झाली आहे.
या कामामुळे मंगळवेढासह सांगोला, पंढरपूर, मोहोळ, जत या तालुक्यातील अनेक गरोदर मातांनी याचा लाभ घेतलेला आहे. याच कामामुळे मंगळवेढ्याची नवी ओळख जिल्हाभर झाली.
शासन प्रशासन दरबारी झाली ही सर्व मंगळेकरांची साठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यामध्ये महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटीचे मोठे योगदान आहे.
रुग्णांना 24 तास रक्ताची उपलब्धता
या हॉस्पिटलमध्ये सध्या 16 स्लाईसच्या अत्यंत उंच तंत्रज्ञाना ची सिटीस्कॅन मशीन आहे. रुग्णांना 24 तास रक्ताची उपलब्धता व्हावी म्हणून एक ब्लड स्टोरेज युनिट चालू केली आहे. आतापर्यंत 103 लोकांना रक्त या ठिकाणाहून मिळालेले आहे.
किडनीचे आजार व मूत्र मार्गाचे आजार आपल्याकडील नागरिक अनेकदा दुर्लक्षित करीत असतात आणि आर्थिक परिस्थिती नसल्याने व दूरवर जावे लागत असल्याने बऱ्याचदा आरोग्यसेवा मिळावी म्हणून प्रयत्नही करताना दिसत नाहीत.
मूत्राशयातील खडे, किडनीतील खडे यावर चांगल्या प्रकारे उपचार
महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटीमध्ये पुण्याचे डॉ.स्वप्नील बोबडे हे नियमितपणे प्रोस्टेट, मूत्राशयातील खडे, किडनीतील खडे यावर चांगल्या प्रकारे उपचार करीत आहेत.
विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
डायलिसिस सुविधा उपलब्ध
ज्या रुग्णांची किडनी बंद पडलेली असते त्यांना डायलिसिस शिवाय पर्याय नसतो. डायलिसिसच्या माध्यमातून रक्तामधील विषारी घटक दूर करून शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया केली जाते.
या हॉस्पिटलमध्ये अशा दोन मशीन असून दररोज दोन ते तीन रुग्णांना याचा मोफत लाभ दिला जातो हे विशेष.
त्याचबरोबर डॉ.अमित गुंडेवार हे अस्थिरोग तज्ञ असून महात्मा फुले योजनेअंतर्गत त्यांनी अनेक रुग्णांना मोफत क्रिया करून दिले आहेत.
24 तास बालकांच्या उपचाराच्या सेवा
डॉ.महेश कोनळी हे बालरोग तज्ञ असून 24 तास बालकांच्या उपचाराच्या सेवा देत आहे. या रुग्णालयातील लहान बालकांचे नवजात अतिदक्षता विभाग अत्यंत सुसज्ज असून महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अनेक बाळांना मोफत सुविधा देण्यात आली आहे.
सुसज्ज कॅथलॅब
हेच महिला हॉस्पिटल आज मल्टीस्पेशालिटी बनलेले असून एन्जिओप्लास्टी व एन्जिओग्राफी सारख्या सेवा देण्याकरिता आवश्यक असलेली सुसज्ज कॅथलॅब निर्माण करून तिचे आज उद्घाटन होत आहे.
यामधून ज्या रुग्णांना हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार झालेले असतात तेव्हा द्वारे दबलेली रक्तवाहिनी पूर्ववत करून उपचार केला जातो.
अशा प्रकारच्या उपचाराला खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. पण आजपासून मंगळवेढेकरांना अशा प्रकारची सेवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत दिली जाणार आहे ही बाब मंगळवेढेकरांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ठरणार आहे यात शंका नाही.
याकरिता आवश्यक असणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाची उपकरणे व साहित्य कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध आहेत, मंगळवेढ्याचे सुपुत्र डॉ.प्रमोद पवार हेही त्यापैकीच एक आहेत.
मंगळवेढकरांनी आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल यशस्वी होईल आणि गोरगरीब जनतेच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचे काम या रुग्णालयामार्फत होईल, अशा भावना डॉक्टर पुष्पांजली शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले आहेत..
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत २८०१ पेशंटची मोफत प्रसूती केली. तसेचे ७३ लहान बालकांचे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार केले, ५९ पेशंटचे मतखड्याचे दुर्बिणीद्वारे लेझर किरणाचा वापर करून ऑपरेशन मोफत केले आहेत.
त्या मधील १० पेशंट हे ८० + वर्षाचे होते तेही व्यवस्थित बरे झाले आहेत. तसेच हाडांचे फ्रक्चर असलेले पेशंट ३५ होते. तेही महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार करून व्यवस्थित बरे झाले आहेते.
सर्व आजार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत
या सर्व पेशंटना मोफत सुविधा दिल्या नंतर आता हार्टअटेक या आजारावर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचाराची सुविधा महिला हॉस्पिटल येथे सुरु आहे. थोडक्यात म्हणजे महिला हॉस्पिटल मध्ये सर्व आजार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत होतात.
आजपासून या कॅथलॅबमध्ये कार्डिओलॉजिस्ट बरोबरच फिजिशियन म्हणून डॉक्टर विलास तोंडे पाटील यांनी एमडी व डीएनबी ची पदवी मेडिसिन शास्त्रामध्ये प्राप्त केली असून गेल्या दोन वर्षापासून आंबेजोगाईच्या शासकीय महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून ते आपली सेवा देत, ते आपल्या मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध होणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज