टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-सोलापूर रोडवरील बेगमपुर येथे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘अश्विन सदन’ या नवीन वास्तूचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती आदित्य इरिगेटर्सचे संचालक जनार्धन शिवशरण व सौ.करुणा शिवशरण यांनी दिली आहे.
आदित्य इरिगेटर्स यांचे शेतकऱ्यांसोबत अतूट नाते जुडले आहे. गेल्या वर्षीच या नवीन वास्तूचा स्थलांतरित सोहळा शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला होता.
आज आदित्य सदन या नवीन वास्तूचा शुभारंभ देखील सर्व मान्यवरांच्या व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आदित्य इरिगेटर्समध्ये फिनॉलेक्स पी.व्ही.सी. पाईप,फिनॉलेक्स ठिबक व सिंचन,फिनॉलेक्स केबल,पोलाद स्टील,अल्ट्राटेक सिमेंट,अँक्वाटेक्स, डेक्कन व के.बी.आर पंम्पचे अधिकृत विक्रेते म्हणून गेली 23 वर्षे शेतकऱ्यांसोबत अतूट नाते निर्माण केले आहे.
‘आदित्य सदन’ वास्तुच्या शुभारंभा प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांनी परिसरातील नागरिकांनी हीच निमंत्रण पत्रिका समजून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जनार्धन शिवशरण व सौ.करुणा जनार्धन शिवशरण यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज