मंगळवेढा टाईम्स न्युज : समाधान फुगारे
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे नूतन प्रेसिडेंट, सेक्रेटरी व संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ आज रविवार दि.13 जुलै रोजी मंगळवेढा येथे होणार असल्याची माहिती क्लबचे आयपीपी अमोल रत्नपारखी यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या रोटरी वर्ष 2025-26 सालासाठी प्रेसिडेंट म्हणून अभिजीत बने व सेक्रेटरी म्हणून कुलदीप रजपूत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा पदग्रहण समारंभ आज रविवार दि.13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल सुगरण पंढरपूर रोड मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आला आहे.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा पदग्रहण समारंभ रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे यांच्या शुभहस्ते होणार असून उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
या पदग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट जयेशभाई पटेल, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या फर्स्ट लेडी संगीता लातूरे, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे असिस्टंट गव्हर्नर प्राचार्य डॉ.कैलाश करांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हॉटेल सुगरण पंढरपूर रोड मंगळवेढा येथे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून या कार्यक्रमासाठी मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अभिजीत बने व सेक्रेटरी कुलदीप रजपूत यांनी केले आहे.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या पदग्रहणाचा हा दैदिप्यमान सोहळा यशस्वी करण्यासाठी उमेश मर्दा, डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, असिफ मुल्ला, प्राचार्य सुधीर पवार, मेजर मल्लय्या स्वामी, चेतन गाडवे, चंगेजखान इनामदार, भरतसिंग राजपुरोहित, डॉ.निनाद नागणे, दिलीप घाडगे, असिफ शेख,
प्रा.सागर पाटील, श्रद्धा रत्नपारखी, जनार्दन शिवशरण, अबोली बने, डॉ.सचिन बनसोडे, डॉ.दत्तात्रय घोडके, अश्विनी रजपूत, सोमनाथ इंगळे यांचेसह रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज