टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात गोवामेड दारू वाहतुकीचे दोन कंटेनर राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबईच्या भरारी पथकाने पकडले.
मंगळवेढा-शिरसी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 1374 बॉक्स दारू व दोन कंटेनर असा 1 कोटी 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी चंद्रकांत गजेंद्र शेरे (वय 24, रा. उंडेगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) आणि महावीर मारूती भोसले (वय 36, रा. पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या दोघा कंटेनरचालकांना अटक करण्यात आली.
या दोघांना विशेष न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.गोवा बनावटीची दोन कंटेनर दारू सोलापूर व आजूबाजूच्या परिसरात विक्रीसाठी आणली जाणार असल्याची माहिती मुंबई येथील भरारी पथकाला मिळाली होती.
त्यावरून पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ते शिरसी या रस्त्यावर येणार्या कंटेनर (क्र. एनएल 02/ के 1133) आणि कंटेनर (क्र. एनएल 02 /के 1127) हे दोन्ही कंटेनर अडविले व त्यांची तपासणी केली.
त्यावेळी कंटेनरमध्ये गोवामेड बिअर व दारूचे 1374 बॉक्स मिळून आले.पथकाने दोन्ही कंटेनरचालकांना ताब्यात घेऊन कंटेनर सोलापूर कार्यालयात आणून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला.
या कारवाई गोवा बनावटीची दारू 1324 बॉक्स, गोवा बनावटीच्या बिअरचे 50 बॉक्स व दोन कंटेनर असा 1 कोटी 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पथकाचे प्रमुख संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, प्रमोद कांबळे, जवान मलंग तांबोळी, अमोल हिप्परगर, धनाजी दळवी,
श्रीराम राठोड, रविंद्र पाटील, सोमनाथ पाटील, अमोल चिलगर, सुधीर देसाई यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज