टीम मंगळवेढा टाईम्स।
सकल मराठा समाजाच्या वतीने आज मंगळवेढ्यात तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना अटकाव आंदोलन करण्यात येणार
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी गेली पाच दिवस अन्न पाण्याविना तसेच वैद्यकीय उपचार नाकारत आमरण उपोषण सुरू केलेले आहे.
त्यांचे समर्थनार्थ मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवशी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
तसेच आज सोमवार सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अटकाव आंदोलन करण्यात येणार आहे.
आपला योद्धाच जर उपाशी असेल तर त्यांच्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवशीय अन्नत्याग उपोषण करण्यात आले
तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले
आंदोलनावरती सरकार कोणताही ठोस निर्णय घेत नसल्यामुळे, समाजाचा उद्रेक कोणत्याही क्षणी होऊ शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाची काळजी म्हणून मतदारसंघातील मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आमदार समाधान आवताडे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत
तसेच आज सोमवार दि.30 रोजी तहसील कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना अटकाव करून करून आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज