टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने खताची विक्री केल्यास आणि खत असूनही देण्यास नकार देणे,
पक्के बिल न देण्याच्या तक्रारी आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना बियाणांची गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रत्यांकडूनच खते व अन्य साहित्य खरेदीस प्राधान्य दयावे, बियाणे खरेदीची पक्की पावती घेऊन त्यावर बियाणांचा संपूर्ण तपशील असल्याची खात्री करावी.
खरेदी केलेल्या बियाणांची पिशवी, थोडे बियाणे पिक कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, खरेदी केलेले बियाणे त्याच हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकटवरील अंतिम मुदत पाहून घ्यावी.
कृषी दुकानदारांनी फसवणूक केल्यास ‘या’ नंबरवर संपर्क साधा
शेतकऱ्यांचे तालुका स्तरावर तक्रारीबाबत समाधान न झाल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक सागर बारवकर (८७८८६७००५०), अशोक मोरे ( ७०८३७७४१०० ), कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे ( ७५५९३६१६६३ ) आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने (८९७५०११९०० ) यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज