मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विजेची गळती होत असल्यास वीजपुरवठा खंडित करून शॉक बसलेल्यास वाचविण्यासाठी ‘महावितरण’ने अवशिष्ट करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी) हे विद्युत सुरक्षा उपकरण तयार केले आहे.
मात्र, अनेकांना दुर्घटना होईपर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही. सोलापूर शहर-जिल्ह्यात आठ दिवसांत झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.
कदाचित, दुर्घटना घडलेल्या ठिकाणी ‘आरसीसीबी’ उपक्रम असते तर या दुर्घटना घडल्याच नसत्या, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘आरसीसीबी’ उपकरण असे आहे, जे विद्युत शॉक आणि विद्युतप्रवाहामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत करते.
हे उपकरण सर्किटमधील गळतीचा प्रवाह शोधून काढते आणि जर हा प्रवाह निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त झाला, तर ते सर्किटमधील वीजपुरवठा त्वरित खंडित करते. ज्यामुळे जीवितहानी किंवा उपकरणांचे नुकसान होत नाही. हे उपकरण विद्युत शॉक लागण्यापासून संरक्षण करते.
जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्राणी विद्युतवाहक तारेला चुकून स्पर्श करते, तेव्हा सर्किटमध्ये गळतीचा प्रवाह तयार होतो. पण, माळशिरसमधील महाळुंग, दक्षिण सोलापुरातील हत्तुर आणि सोलापूर शहर, अशा तीन घटनांमध्ये प्रत्येकी दोघांचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.
‘आरसीसीबी’ उपकरण नेमके काय आहे?
सामान्य ऑपरेटिंग परिस्थितीत, ‘आरसीसीबी’ हे सर्किटमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचे निरीक्षण करते. येणारा विद्युत प्रवाह (लाइव्ह वायर) परत येणाऱ्या प्रवाहाशी (न्यूट्रल वायर) जुळतो का ते तपासते.
तरीपण, चुकून जिवंत वायरला किंवा खराब झालेल्या वायरला स्पर्श केला, तर काही विद्युतप्रवाह तटस्थ वायरमधून परत येण्याऐवजी जमिनीवर गळू शकतो. यामुळे विद्युतप्रवाह असंतुलित होतो.
पण, जेव्हा ‘आरसीसीबी’ला विद्युत प्रवाह असंतुलित जाणवतो तेव्हा ते आपोआप सर्किटची वीज बंद करते. ही क्रिया एका सेकंदाच्या काही अंशात घडते.
प्रवाह खंडित झाल्याने विजेचा धक्का रोखला जातो. त्यामुळे ते उपकरण जिवंत वस्तूला स्पर्श केल्यावर होणाऱ्या विजेच्या झटक्यांपासून बचाव करते, ज्यामुळे दुखापत किंवा धोका कमी होतो.(स्रोत:सकाळ)
दुर्घटना टाळण्यासाठी ग्राहकांनी उपकरण वापरावे
महावितरणच्या सर्व ग्राहकांनी विजेचा शॉक लागून मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी ईलसीबी किंवा आरसीसीबी यापैकी कोणतेही एक उपकरण बसवावे.- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज