टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्य शासनाने घरकुलासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी असे निवेदन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संदीप फडतरे यांनी निवेदन दिले.
प्रधानमंत्री घरकुल योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान थोडके असून या अनुदानातील ५० टक्के पेक्षा अधिक रक्कम वाळूवर खर्च पडते. त्यामुळे बांधकाम पुर्ण होण्यासाठी अडचणी निर्माण होतात.
मागील सरकारने घरकुलावर त्यांना ५ ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला होता त्याचप्रमाणे मंगळवेढा शहरातील लाभार्थ्यांना वाळूही देण्यात आली मात्र ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास वाळू दिली नाही.
प्रशासनाच्या तगाद्याने अव्वाच्या सव्वा देवून वाळू खरेदी केली काही प्रसंगी मायक्रो फायनान्स, बँका, पतसंस्था यांची कर्जे काढून घरकुलाची कामे पूर्ण केली.
सध्या मंगळवेढयातील पंचायत समितीच्या १३७७ ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा पहिला हप्ता घेवून बांधकामे सुरू केली नाहीत. त्यांची परिस्थिती नसल्यामुळे पुढील बांधकामे पुर्ण करू शकणार नाहीत उलट घेतलेले अनुदान परत करण्याबाबत नोटीसा देण्याच्या तयारीत पंचायत समिती
प्रशासन असुन त्यांना मागील सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत मोफत वाळू दिली होती त्याच धरतीवर
चालू राज्य शासनाने त्या गोरगरीब लाभार्थ्यांचे बांधकाम पुर्ण करून तो हक्काच्या निवाऱ्यात राहु शकेल यासाठी मोफत पाच ब्रास वाळू देण्यात यावी असे त्या मागणीत फडतरे यांनी म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज