टीम मंगळवेढा टाईम्स।
कर्जापोटी बँकेकडे तारण ठेवलेल्या सीलबंद घराचे कुलूप तोडून बेकायदेशीररित्या वास्तव्य करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कर्जदाराविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्रीकांत शांतिसागर आंबुडकर यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी कर्जदार प्रमोद लक्ष्मण वास्ते यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २२३, ३२४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रतनचंद शहा सहकारी बँक लि., मंगळवेढा शाखा करकंब यांच्याकडून कर्जदार प्रमोद लक्ष्मण वास्ते (रा. करकंब) यांना दि. ११ जानेवारी २०१९ रोजी करकंब गावातील बांधकामासाठी १२ लाखांच्या कर्जाची मागणी केल्याने ते बँकेने शर्ती व अटीनुसार मंजूर करण्यात आले होते.
याबदल्यात कर्जदाराने रजिस्टर मॉरगेजने वरील घर (जागा) बँकेस लिहून दिलेली आहे. कर्जदार याने कर्जाचे हफ्ते न भरल्याने तसेच त्यांना वेळोवेळी हप्ते भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या,
तरीही कर्जदार यांनी हप्ते न भरल्याने बँकेचे प्राधिकृत अधिकारी यांनी कर्जदारांनी तारण दिलेल्या मिळकतीचा ताबा मिळण्याकरिता दावा केला होता.
दि.२१ मे २०२४ रोजी आर.सी.सी. बांधकामामधील गाळ्याचा शटरचा व मुख्य दरवाजा सीलबंद करून बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्रीकांत शांतिसागर आंबुडकर यांच्या ताब्यात दिले होते.
परंतु, कर्जदार यांनी शासकीय आदेशाची उल्लंघन करून कोणत्याही न्यायालयीन स्थगितीचा आदेश किंवा बँकेकडे कर्जाची रक्कम न भरता
बँकेच्या ताब्यातील मिळकतीला लावलेले सीलबंद कुलूप तोडून नुकसान करून घरामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून विनापरवाना वास्तव्य करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज