टीम मंगळवेढा टाईम्स ।
कर्नाटक राज्यातून नंदूर मार्गे कारमधून जाणारा 66 हजार 480 रुपये किमतीचा गुटखा व 2 लाखाची कार असा एकूण 2 लाख 66 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सलीम हुसेन पटेल (वय 36) व विठ्ठल गंगाधर व्यवहारे (वय 44 रा.बेगमपूर ता.मोहोळ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान ही कारवाई पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मात्र मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील टपरीत गुटखा कोठून येतोय हा संशोधनाचा विषय बनला असून याचा तपास लागणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, बोराळे बीटचे हवालदार महेश कोळी यांना दि.21 रोजी दुपारी 12.30 वा. चडचणहून नंदूर मार्गे एका कारमधून अवैधरित्या गुटखा जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी
पोलिस हवालदार महेश कोळी,पोलिस नाईक कृष्णा जाधव,पोलिस नाईक बनकर,पोलिस नाईक किशोर दुधाळ,पोलिस शिपाई सोमनाथ माने,मळसिध्द कोळी यांचे पोलिस पथक पाठवून
या घटनेबाबत शहनिशा करीत असताना नंदूर गावच्या अलिकडे जिल्हा परिषद शाळेजवळील पाण्याच्या टाकीजवळ ते पथक आले असता समोरून एक सेंट्रो कंपनीची कार एम एच 02, के.ए.9028 ही येत असल्याचे दिसून आले.
पोलिस हवालदार महेश कोळी यांनी कारला हाताने इशारा करून गाडी थांबवली असता त्यामध्ये मोठया दोन पिशव्या व कागदी बॉक्स शीटवर ठेवल्याचे दिसून आले.
याबाबत अधिक चौकशी केली असता गुटखा असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यामध्ये 24 हजार रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे 200 पाकिटे,
6 हजार रुपये किमतीचे व्ही वन तंबाखूचे 200 पाकिटे,11520 रुपवये किमतीचे आरएमडी सुगंधी तंबाखू 32 पाकिटे,24960 रुपये किमतीचे आर एम डी पान मसाला 32 पाकिटे असा एकूण 66 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला.
पोलिसांनी मुद्देमालासह कारही जप्त केली आहे. दरम्यान ही कारवाई पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मंगळवेढयापासून कर्नाटक हद्द 20 ते 25 कि.मी.अंतरावर असल्याने मोठया प्रमाणात कर्नाटकातून लगतच्या भागात मंगळवेढा मार्गे गुटख्याची वाहतूक होत असते.
वेळोवेळी पोलिस कारवाई करूनही हा प्रकार थांबला जात नाही. छोटया मोठया पानटपर्या, हॉटेलमधून खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.
अन्न औषध प्रशासन अधिकार्यांनीही ग्रामीण भागात शोध मोहिम राबवून कारवाई केल्यास बेकायदा होणारी गुटख्याची वाहतूक थांबण्यास मदत होईल.
महाराष्ट्र सरकारने तरूण युवकांच्या भवितव्याचा विचार करून तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी गुटखाबंदीचा निर्णय घेतला.
मात्र कर्नाटक राज्यात याला बंदी नसल्यामुळे त्या निर्णयाची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज