mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 10, 2026
in क्राईम, मंगळवेढा
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

टीम ​मंगळवेढा टाईम्स ।

पतीने मुलीची मागणी केली असता तिने नकार दिला, या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या पतीने, सासूने आणि नणंदेने मिळून एका २१ वर्षीय विवाहितेवर दगड आणि काठीने गंभीर हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढ्यातील कचरेवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक्षा अभिजीत यादव (वय २१) ही सध्या कचरेवाडी येथील आपल्या माहेरी राहत होती.

दि.५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० च्या सुमारास तिचा पती अभिजीत रतन यादव आणि सासू राणी रतन यादव (दोघे रा. मारापूर) हे माहेरी आले.

यावेळी पतीने “तुला झालेली लहान मुलगी माझ्याकडे दे, मी तिला काय पण करीन, नाहीतर मारून टाकीन” अशी धमकी दिली.

​जेव्हा प्रतीक्षाने मुलगी देण्यास नकार दिला, तेव्हा चिडलेल्या पती, सासू आणि नणंद पूजा संदीप काळुंगे यांनी तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या प्रतीक्षाच्या आई-वडिलांना आणि भावाला देखील आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली.

​दगडाने नाकावर वार, काठीने भावाला मारहाण

​हा वाद इतका विकोपाला गेला की, सासू राणी यादव हिने जमिनीवर पडलेला दगड उचलून प्रतीक्षाच्या नाकावर जोरात मारला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

तसेच नणंदेने तिला जमिनीवर ढकलून दिल्याने तिच्या गुडघ्याला जखम झाली. आरोपी पती अभिजीत याने प्रतीक्षाचा भाऊ संदीप याला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

​वैद्यकीय उपचार आणि पोलीस कारवाई

​घटनेनंतर जखमी प्रतीक्षाला तातडीने ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी सोलापूर हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.

​याप्रकरणी प्रतीक्षा यादव हिने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी पती अभिजीत यादव, सासू राणी यादव आणि नणंद पूजा काळुंगे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पत्नीला मारहाण

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

April 10, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सभापती दिपाली ताड यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; आज पाटकळमध्ये प्रशासकीय सेवा आता आपल्या दारी

April 10, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

​अजब चोरी! मंगळवेढ्यात बँकेची तिजोरी सोडून चोरट्यांनी ‘भंगारा’वर मारला डल्ला; ‘हे’ साहित्य पळवून पोलिसांना दिले खुले आव्हान

April 9, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

तांडोर-सिद्धपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; १० लाखांच्या भव्य अभ्यासिकेचे आज आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून भूमिपूजन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा

April 9, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

धार्मिक मार्गावर मांस विक्रीचा हैदोस; आक्रमक झालेल्या महिला मोर्चाचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; संतांच्या भूमीचा अपमान खपवून घेणार नाही

April 8, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यात १४ वर्षांच्या बालिकेचा बेकायदेशीर विवाह; सासरच्या जाचाला कंटाळून चिमुरडीची आत्महत्या; जन्मदात्या आई-वडिलांसह पती, सासू-सासाऱ्यांवर गुन्हा दाखल

April 8, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
Next Post
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे 'शिवबंधन'; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 9, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

April 9, 2026
पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पाटखळ येथे कै. हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

April 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सभापती दिपाली ताड यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; आज पाटकळमध्ये प्रशासकीय सेवा आता आपल्या दारी

April 9, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..