mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल; सोलापुरात घडली घटना; पती वकील, मंगळवेढ्यातील असल्याची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 18, 2025
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

सोलापूर शहरातील वसंत विहार येथील स्वराज विहार भागात आज शुक्रवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. घरगुती वादातून वकील असलेल्या पतीने आपल्या पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केला. या घटनेनंतर आरोपी पतीने स्वतः फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हजेरी लावत गुन्ह्याची कबुली दिली.

खून झालेल्या महिलेचं नाव भाग्यश्री प्रशांत राजहंस (वय ३४, रा. स्वराज विहार, वसंत विहारजवळ, सोलापूर) असून आरोपी पतीचे नाव प्रशांत रवींद्र राजहंस (वय ४४ मूळ मंगळवेढा) आहे, जो व्यवसायाने वकील आहे.

भाग्यश्री आणि प्रशांत यांचा विवाह लॉकडाऊन काळात, २०२१ मध्ये झाला होता. विवाहानंतर ते काही काळ मंगळवेढा येथे राहत होते.

सततच्या किरकोळ वादांमुळे नातेवाईकांनी त्यांना सोलापुरात स्थायिक होण्याचा सल्ला दिला होता. गेल्या सहा महिन्यांपासून दोघं स्वराज विहारमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.

आज सकाळी भाग्यश्रीने आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक प्रेरणादायी ‘गुड मॉर्निंग’ मेसेज पाठवला. मात्र, काही वेळातच नवरा-बायकोमध्ये पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात प्रशांतने धारदार चाकूने भाग्यश्रीच्या मानेवर आणि गळ्यावर वार करून तिचा खून केला.

पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण

खून केल्यानंतर आरोपी प्रशांत राजहंस स्वतः फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गेला आणि घडलेली घटना सांगून खुनाची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता, भाग्यश्री गंभीर जखमी अवस्थेत बेडरूममध्ये आढळली. तिला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा आक्रोश

घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. महिलांचा आक्रोश आणि हंबरडा यामुळे वातावरण गहिवरून गेलं होतं.

पोलिस ठाण्याबाहेर बंदोबस्त

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. भाग्यश्रीचे नातेवाईक आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिस ठाण्यासमोर जमले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे सपोनि अजित पाटील हे करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वकील हत्या

संबंधित बातम्या

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता तुमच्या भेटीला

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
Next Post
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

निकराची झुंज! लोकनियुक्त सरपंचांना हटवण्यासाठी संपूर्ण गावाने मतदान केलं, अन् अविश्वास ठराव आणला; 'या' गावात नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता तुमच्या भेटीला

March 11, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..