टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून बिल देण्याचा बहाणा करीत मालकाचे लक्ष नसल्यीची संधी साधत चक्क पुणे येथील आय.टी.कंपनीत मॅनेजर असलेल्या एका 30 वर्षीय तरूणाने हॉटेल मालकाने काऊंटरवर चार्जिंगला लावलेला 22 हजार रुपये किमतीचा मोबाईल चलाखीने पळविण्याचा प्रकार घडला आहे.
दरम्यान पोलिसांनी तपासाची वेगाने सुत्रे फिरवून 48 तासाच्या आत आरोपीस अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, मंगळवेढा -पंढरपूर रोडवर असलेल्या एका हॉटेलचे मालक तथा फिर्यादी राहुल खांडेकर हे दि.5 रोजी हॉटेलमध्ये गर्दी नसल्याने काऊंटरवर रेडमी कंपनीचा 22 हजार रुपये किमतीचा
स्मार्ट फोन चार्जिंगला लावून सायंकाळी 4.00 वा.जेवायला बसले होते. या दरम्यान आरोपी स्वप्नील सुरेश सिदवाडकर (मूळ रा.गुजरात सध्या सिंहगड रोड पुणे) हा कुटुंबासह हॉटेलमध्ये जेवण करण्यास आला होता.
जेवण करून बिल देण्याचा बहाणा करीत काऊंटरजवळ येवून कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून चार्जिंगला लावलेला मोबाईल हातचलाखीने चोरून घेवून त्याच्या गुजरात या मूळ गावी निघून गेला होता.
दरम्यान मोबाईल चोरीच्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली
तपासिक अंमलदार पोलिस नाईक विठ्ठल विभुते यांनी तपासाच्या अनुषंगाने हॉटेलमधील तांत्रिक साधनांचे सहाय्य घेवून सुतावरून स्वर्ग गाठीत 48 तासाच्या आत त्या आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळविले.
आरोपीस मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या आय.टी.कंपनीत काम करणार्या मॅनेजरने अन्य काही चोर्या केल्यात का याचाही शोध पोलिस घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज