मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
टेंभुर्णी येथील हॉटेल ७७७७ चा मालक रील स्टार लखन हरिदास माने याने मॅनेजर याला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याप्रकरणी माने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ ऑगस्ट महिन्यातील असून, १४ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्याने पोलिसांनी फिर्यादी निवास आप्पासाहेब नकाते (वय ४४, रा. शिक्षक सोसायटी, बेंबळे रोड, टेंभुर्णी) यांची तक्रार दाखल करून घेतली.
ऑगस्ट महिन्यात संशयित आरोपीने ‘काम नीट करत नाहीस’, या कारणावरून फिर्यादीच्या अंगावरील कपडे काढून,

त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने घेतले. त्यांना नग्न करून हॉटेलच्या बाहेर सर्व कामगारांसमोर उभे केले आणि शिवीगाळ करत अपमानित केले.
त्याचदरम्यान संशयित आरोपी लखन माने याने लोखंडी पाइपने फिर्यादीच्या पार्श्वभागावर जोरजोरात मारहाण केली.

तसेच ‘तू तक्रार दिलीस किंवा काम सोडलेस तर तुला जिवे मारेन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

याच घटनेदरम्यान संशयित आरोपीने फिर्यादीचे कपडे काढलेल्या अवस्थेतील व्हिडिओ शूट करून तो व्हायरल केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत आहे.
https://www.instagram.com/reel/DRFPgonDoNp/?igsh=YWtyd2podHRid2k4
ही बाब उघडकीस आल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी हॉटेल मालकाविरुद्ध भा.न्या.सं. २०२३ चे विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













