टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा ते मरवडे रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळ आज रविवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ६ चाकी टाटा कंटेनरने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आसबेवाडी (ता. मंगळवेढा) येथील उमेश गमन खटकाळे (वय ३८) आणि त्यांचा भाचा नारायण रतिलाल आसबे (वय ३५) हे दोघे आपल्या बजाज मोटारसायकलवरून (क्रमांक: MH-13-DG-0119) मंगळवेढ्याहून आपल्या गावाकडे परतत होते.

लक्ष्मी मंदिराजवळ पोहोचले असता, पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या ६ चाकी कंटेनरने (क्रमांक: MH-04-JK-1401) त्यांना जोरदार धडक दिली.

जागीच मृत्यू आणि गंभीर दुखापत
ही धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलच्या मागे बसलेले नारायण आसबे यांचा जागीच मृत्यू झाला. चालक उमेश खटकाळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

चालकावर गुन्हा दाखल
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत नारायण यांचा मृतदेह मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी तानाजी विठ्ठल मोरे यांनी फिर्याद दिली असून, कंटेनर चालक मोहम्मद कमरुद्दीन मोहम्मद साब्बीरुद्दीन (रा. झारखंड) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेमुळे आसबेवाडी परिसरात शोककळा पसरली असून, वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










