mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! ‘या’ मतदान केंद्रावर होमगार्डला मारले, तालुक्यात ७९.५९ टक्के मतदान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 16, 2021
in मंगळवेढा, क्राईम
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

टीम मंगळवेढा टाइम्स ।

होमगार्डला मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी बालाजीनगर येथील दोघांवर मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी सायंकाळी ५.१८ वाजता मंगळवेढ्यात बालाजीनगर येथे ही घटना घडली असून, याबाबत होमगार्ड ज्ञानेश्वर मेटकरी (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बालाजीनगर ग्रामपंचायत येथे निवडणुकीत मेटकरी हे गणवेशात काम करीत होते. निवडणुकीचे कामकाजाची प्रक्रिया सुरू असताना आरोपी युवराज बंडू पवार (वय २९), मिथुन महादेव पवार (दोघे राहा. बालाजीनगर) हे दोघे वारंवार मतदान केंद्रावर ये-जा करीत होते. त्यांना तुम्ही सारखे मतदान केंद्रावर कशाला ये-जा करता असे विचारले असता दोघेही अंगावर धावून आले.

सेवा करून तू मला कायदा शिकवू नकोस..आमच्या पगारवर जगतो, असे म्हणत मेटकरी यांच्या शर्टाच्या कॉलरला पकडले. त्यानंतर मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बुरसे करत आहेत.

मंगळवेढा तालुक्यात ७९.५९ टक्के मतदान

मंगळवेढा तालुक्यामध्ये २२ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान झाले. हे मतदान जवळजवळ ७९.५९ टक्के इतके मतदान आले आहे.

यामध्ये नंदेश्वर, बोराळे, मरवडे, सिद्धापूर, माचणूर, गणेशवाडी, लवंगी, सलगर बुद्रुक या गावांमध्ये मोठ्या चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने परगावी राहणारे ऊसतोड मजूर, मुंबई, पुणे, आदी भागांतून नागरिकांना मतदानासाठी खास करून उमेदवाराने आणले होते. विविध ठिकाणी मतदारांच्या जेवणाची सोय प्रमुख उमेदवारांनी केली होती.

सिद्धापूर, नंदेश्वर, मरवडे, सलगर बुद्रुक याठिकाणी मतदान झाले. सकाळपासूनच मतदानाला महिला व पुरुषांची गर्दी होती. सकाळी-सकाळीच वयोवृद्ध मंडळींना मतदानाला आणण्यासाठी वाहनांची सोय केली होती.

तालुक्यामध्ये या निवडणुकीत उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्यासह विविध निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या ठिकाणी भेटी दिल्या.

असे झाले मतदान

मरवडे ४७०६ पैकी ३८१७, लमाणतांडा १३२९ पैकी १०३९, कात्राळ-कर्जाळ ११६९ पैकी ८६७, बोराळे ४१४३ पैकी ३३९७, सिद्धापूर २९३८ पैकी २५२५, अरळी २०८० पैकी १७६१, तांडोर ९३२ पैकी ८२५, हुलजंती ३७०४ पैकी २९५४, आसबेवाडी ९२८ पैकी ८५६, सलगर बु. ३४६८ पैकी २६८७, लवंगी २३८६ पैकी १७९१, डोणज ३०८८ पैकी २५७३, माचणूर १७९५ पैकी १५०६, तामदर्डी २२१ पैकी १७०, कचरेवाडी २३९८ पैकी १८७३, गणेशवाडी १२९५ पैकी ९७९, लेंडवे चिंचाळे २०८५ पैकी १७४७, महमदाबाद शे. ७०२ पैकी ६५८, घरनिकी ४३३ पैकी ३६९, मल्लेवाडी ८४६ पैकी ७२६, भोसे ४७४६ पैकी २८६६, नंदेश्वर ५२८३ पैकी ४३४४ असे २१ ग्रामपंचायतींसाठी ७९.५९ टक्के मतदान झाले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post

महिलांनो, यंदा वाणाचे ट्रेंड बदलले; हळदी-कुंकू लावताना स्पर्श टाळण्यासाठी 'हटके' ट्रिक्स

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..