टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा परिसरात शानिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे खरीपांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यातभरात अधून मधून पाऊस दमदार बरसला आहे.
यामुळे कांदा, उडीद, मका, तुर पिके पाण्यातच सडून जात आहे.यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या मंगळवेढा परिसरात व तालुक्यातील काही गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
सध्या मंगळवेढा परिसरात शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ओढे, बंधारे, नाले, विहीरी भरुन वाहत आहेत. सध्या विहीरी ओसंडुन वाहत आहेत.
सध्या मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. मात्र , ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे आतोनात नुकसान झाले आहे.
मंगळवेढयात सातत्याने विज पुरवठा खंडीत होत असल्याने व्यक्त होतोय संताप; मंगळवेढयात नागरिक अंधारात तर अधिकारी उजेडात असल्याचा प्रकार
मंगळवेढा शहरातील विज पुरवठा रात्री – बेरात्री सातत्याने खंडीत होत असल्याने नागरिकांना अंधाराला सामोरे जावे लागत आहे.अधिकारी उजेडात व नागरिक अंधारात अशी परिस्थिती सध्या मंगळवेढयातील नागरिकांना अनुभवास येत असल्याने त्या अधिकाऱ्याच्या कामकाजाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून
नव्याने दाखल झालेले विज वितरणचे अधिक्षक अभियंता यांनी गांभिर्यपूर्वक लक्ष घालून येथील विज खंडीत होवून नागरिकांना नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी मंगळवेढा शहर वासियांतून आग्रहाने पुढे येत आहे.
मंगळवेढा शहरात सातत्याने रात्री – बेरात्री व दिवसाही विज पुरवठा खंडीत होत असल्याने मंगळवेढयातील लाईट बिनभरोशाची बनली आहे.
परिणामी नागरिकांना डासांच्या उपद्रवांना व उकाडयाला सामोरे जावे लागत असल्याने विज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्याबाबत संताप व्यक्त होत व्यक्त होत आहे.सध्या पावसाळयाचे दिवस असल्यामुळे पाणी साचून मोठया प्रमाणात डेंग्यु, ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण वाढत असताना सतत जाणाऱ्या विजेमुळे त्यात डास चावून अधिक भर पडत असल्याच्या तक्रारी शहरवासियांतून आहेत.
रात्रीच्यावेळी शहर व तालुक्याची जबाबदारी असणारे अधिकारी नेमणूकीच्या ठिकाणी निवासी न राहता ५५ कि.मी.अंतरावर जिल्हयाच्या ठिकाणी रहात असल्याने मंगळवेढयात अंधार की उजेड ? याबाबत त्यांना काहीच कल्पना नसल्याने नागरिक मात्र अंधारात हैराण होत आहेत.
वरिष्ठ अधिकारीच येथे रहात नसल्याने इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांवर अंकुश कसा राहणार असा मंगळवेढयातील नागरिकांचा सवाल आहे.
शक्यतो शासनाचा नियम नेमणूकीच्या ठिकाणी निवासी रहाण्याचा असतानाही त्या नियमाला कचऱ्याची टोपली अधिकाऱ्यांकडून दाखवली जात आहे.ऊर्जामंत्री यांनी या कामी लक्ष घालून सर्वच अधिकाऱ्यांना नेमणूकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक करून जनतेला रात्री व दिवसा विज पुरवठा कसा सुरळीत देता येईल याचा गांभिर्यपूर्वक विचार करावा.
दरम्यान, विज वितरण कार्यालयात शहरामध्ये कुठे विजेचा घोटाळा झाला याची माहिती संबंधित लाईनमन कर्मचाऱ्यांना होण्यासाठी मोबाईल ठेवण्यात आला आहे.
मात्र तेथील ऑपरेटर लाईट गेल्यानंतर मोबाईल उचलत नसल्याचा अनुभव नागरिकांना अनेक वेळा आलेला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी तेथील ऑपरेटरना किमान फोन उचलून नागरिकांची काय तक्रार आहे हे जाणून घेण्याची तसदी घेण्याच्या सूचना कराव्यात अन्यथा हा फोन म्हणजे केवळ शोभेची वस्तू ठरेल अशा प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज