मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर कुठे नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत.
माळशिरस तालुक्यात विजेचा करंट उतरुन दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरल्याने एका गाईसह कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील महाळुंगे येथे घडली आहे.
माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील ढवळे वस्तीवर ही दुर्दैवी घटना झाली असून यात सानिकाबाई विठ्ठल रेडे (वय 57) आणि सुवर्णा अमोल रेडे (वय 27) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली.
गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना सानिकाबाईंना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळात सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या असता
त्यांनाही या विजेचा झटका बसून त्यांचाही जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचून, तिथे शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज